Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३९ )

 तथापि रामचंद्र अथवा रामदेव हाच दक्षिणेतील वैभव संपन्न व स्वतंत्र असा शेवटचा राज्यकर्ता होय. कारण याच राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत मुसल- मान लोकांनीं दक्षिणेत प्रवेश केला, व त्या काळात अत्यंत भरभराटीत अस लेले यादवांचे राज्य नामशेष करून टाकिलें. दिल्लो येथील खिलजी घराण्यांतील प्रसिद्ध बादशहा जलालुद्दीन फिरोज ( कारकीर्द इ. सन १२८९ ते इ. सन (१२९५ ) याने राज्याधिकारूढ झाल्यावर आपला भाऊ शहाबुद्दीन याचे दोन मुलगे नामें अल्लाउद्दीन व अल्वसवेग हे आपणा जवळ बाळगिले होते; त्यांतील: अलाउद्दीन हा विशेष पराक्रमी असून त्यानें मोंगल लोकांनां माघार घेणें भाग पाडिलें होतें; त्यामुळे खुष होऊन बादशाहाने त्यास गंगा व यमुना या नद्यां मधील अंतर्वेदी प्रांतातील कुरा या नांवाच्या प्रदेशावर सुभेदार नेमिलें होतें. पुढे इ. सन १२९३ मध्ये त्याने माळवा प्रांतावरील स्वारींत मोठा पराक्रम गाजविला; त्यामुळे जलालुद्दीन यानें भायोध्या प्रांताची सुभेदारी ही त्याच्या कडे सोपविली. अल्लाउद्दीन हा मोठा घाडशी व महत्वाकांक्षी असून तो माळवा प्रांतीं लिखा येथे असतां दक्षिर्णेतील देवगड, देवगिरी, अथवा दौलताबाद, या धनाढ्य शहराची, व तेथील वैभवसंपन्न यादव राज्याची, त्यास बातमी मिळाली; व त्याच वेळे पासून त्या प्रदेशावर स्वारी करण्याचे विचार त्याच्या मनांत घोळू लागले. अल्लाउद्दीन हा विशेष धोरणी असून हिंदू लोकांच्या सात्विक स्वभावाची त्यास पूर्णपणे माहिती होती. आणि त्यांच्या प्रत्येक व्यवहारांत धर्माधर्माचें विशेष प्राबल्य असतें, व त्यामुळे धर्मयुद्धचे नियम बरोबर रीतीने पाळितात, शत्रूस सावध केल्या शिवाय ते युद्ध करीत नाहींत, वगैरे हिंदू स्वभावाची प्रवृत्ती तो पूर्णपणे जाणून होता; म्हणून दक्षिण प्रांतावर स्वारी करून, आपणास तिकडे सहज दिग्विजय मिळविता येईल अशी त्याची खात्री होती. त्या प्रमाणे त्याने आपला काका बादशहा जलाउद्दीन यांजकडून तिकडील प्रदेशावर स्वारी करण्याची परवानगी मिळविली इ. सन १२९३ मध्ये आपणा बरोबर आठ हजार सैन्य घेऊन तो कुरा येथून या मोहिमेवर निघाला, व


भागवत व हरिवंश वांचून "उषाहरण " या नांवाचा एक ओवीबद्ध ग्रंथ लिहिला असून त्याचा कांही भाग हल्लीं उपलब्ध झाला आहे. या ग्रंथाची भाषा जुनी असून हल्लीच्या भाषा पद्धतीच्या मानानें दुर्बोध आहे.