Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४१ )

यतांमध्ये बन्याच वेळपर्यंत मोठया निकराचे युद्ध झाले. शंकरदेवा बरोबरील सैन्य कसलेले असून अल्लाउद्दीनच्या सैन्याच्या मानानेंही तें पुष्कळच मोठें होतें; शिवाय स्वतः शंकरदेवानेही जिवावर उदार होऊन मोठया निकराने अल्लाउद्दीनशीं संग्राम सुरू केला होता. त्यामुळे अल्लाउद्दीन याचा पूर्ण पराजय होऊन त्याचा सर्वस्वीं नाश होण्याची वेळ आली होती; इतक्यांत त्यानें मार्गे ठेविलेले एक हजार शिलकी सैन्य त्याच्या मदतीस धांवून आले; त्या वेळीं शंकरदेवास व त्याच्या सैन्यास, अल्लाउद्दीन यानें, जी मोठी बादशाही फौज आपल्या मदतीस येत आहे, म्हणून बातमी पसरविली होती ती हीच आहे,. असे वाटून अतीशय भीति उत्पन्न झाली; या जंगी फौजेपुढे आपला आतां निभाव लागणार नाहीं असें वाटून त्यानें व त्याच्या सैन्यानं माघार घेतली; ब सैन्याची फळी फुटून ते जिवाच्या भीतीनें सैरावैरा पळू लागले.ही संधी साधून अल्लाउद्दीन यानें लगट केली, व या सैन्यावर पूर्ण विजय मिळवून तो जेताबनला. इकडे किल्ल्यातील धान्य सामुग्रीही संपत भाली होती, व धान्या ऐवर्जी मिठाची पोतीं भरून ठेवली असल्याचे दृष्टोसत्तीस भालें होतें. तेव्हां रामदेव रावास तह करण्याशिवाय दुसरें गत्यंतरच राहिले नव्हते. त्यामुळे अखेरीस त्यानें नाइलाजानं अलाउद्दीनशीं तह केला; त्या अन्वये त्याने बादशहाच्या तर्फे : अलाउद्दीन यांस " सहाशें मण मोर्ती, दोन हजार मण रत्ने, एक हजार मण रूप, चार हजार' रेशमी कापडाची ठाणी आणि इतर अनेक मौल्यवान् वस्तु याव्या, दरसाल विविक्षितं रकमेची खंडणी दिल्लीस पोहोंचती करावी, आणि एलीचपूर व त्याच्या आसपासचा प्रदेश बादशहास निरंतरचा तोडून द्यावा, भसें ठरले; व त्याप्रमाणें ऐवज पटल्यावर अलाउद्दीन याने देवगिरी वरीड : आपला शह उठवून तो दिल्ली येथे परत गेला.
 अशा रितीनें, दक्षिणेतील वादवाचे स्वतंत्र राज्य; दिल्लीपतिच्या नियंत्रणा स्वाल मांडलीक राज्य बनले. हे राज्य पुढे काही काळ पर्यंत अस्तित्वांत राहिले; परंतु अलाउद्दीन बरोबरील तहा अन्वये त्याची स्वतंत्रता नष्ट झाल्या बरोबरक त्या राज्याचे वैभव व विजयोसादक शक्ती हीं पूर्णपणे नष्ट होऊन गेली. अल्ला- • उद्दीन हा उत्तर हिंदुस्तानी 3. गेल्यानंतर लवकरच (इ.सन १२९६) त्यानें आपला काका व बादशहा जलालुद्दीन यांस विश्वासघाताने ठार मारून तो राज्याधि