Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३८ )

राजाचा नामनिर्देश व गौरव केला आहे, त्या प्रमाणेच महान साधू ज्ञानेश्वर यानें ही आपल्या " ज्ञानेश्वरी" या ग्रंथति रामदेव उर्फ रामचंद्र यादव राजाचा मोठ्या गौरवाने नामनिर्देश केला आहे; आणि "कलियुगांत गोदावरी नदीच्या दक्षिण तीरी पांच कोस परिधाच एक पुण्य क्षेत्र असून तें अखिल त्रिभुवनांत पवित्रतम असे आहे, व त्यति महालया असून तं जीवन सूत्र आहे; त्या पवित्र क्षेत्रति यदुकुलांकुर राजा रामचंद्र हा सकल कलाचें निवास स्थान म्हणून असुन तो न्यायाचे पोषण करितो, अथवा अन्याय होऊनये म्हणून काळजी घेतो; तेथें महेशाच्या वंशीं उतन्न झालेला, व निवृत्तीनाथाचा पुत्र ज्ञानदेव ह्यानें भग- गीतेला हा देशी पेहराव चढविला, " असें त्या ग्रंथाच्या शेवटों दिग्दर्शन केले आहे.*


  • ऐसे युग परि कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी ॥

श्री गोदावरीच्या कुळीं । दक्षिणली ॥ १ ॥
त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र ||
नेथ जगाचें जीवनसूत्र | श्री महालया असे ॥ २ ॥
तेथ यदुवंश विलास । जो सकळ कळा निवास ||
न्यायातें पोप क्षितीश । श्री रामचंद्र ॥ ३ ॥
तेथ महेशान्वय संभूतें । श्री निवृत्तिनाथ सुतें ॥
केले ज्ञानदेवें गीतं । देशीकार लेणें ॥ ४ ॥

 ज्ञानदेवाच्या वडिलाचे नांव विट्ठलपंत असें असून वरील ओव्यांतील चवथींत ज्ञानेश्वरानें, आपणाला "श्री निवृत्तिनाथ सुत " असें म्हणवून घेतल आहे; याचे कारण, ज्ञानदेवास त्याचा वडील भाऊ निवृत्तिनाथ यानेंच प्रथम अध्यात्मज्ञान करून दिले; व त्यामुळे तो निवृत्तिनाथास आपल्या वडील बंधूस- पितृस्थानीं व गुरूस्थानी मानीत होता, हे आहे व म्हणूनच त्यानें ज्ञानेश्वरीच्या शेवटी तसा उल्लेख केला आहे; या ज्ञानेश्वरीची मूळप्रत अलीकडे उपलब्ध झाली असून तिच्या वरून तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप लक्षांत येते. ज्ञानेश्वरानंतर दोनशे वर्षांत एकही मराठी कवी निर्माण झाला नाहीं, असा आजपर्यंत समज होता; परंतु अलीकडील उपलब्ध माहिती प्रमाणे त्याच्या नंतर थोडक्याच कालांत, चोभा या नांवाचा एक ब्राह्मण कवी होऊन गेल्याचे कळते; त्यानें