Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३७ )

तील सासवड येथें समाधिस्त झाला; या तीघांची बहीण नामें मुक्ताबाई ही ही महा धर्मनिष्ठ व साध्वी स्त्री म्हणून प्रसिद्ध असून तिने कित्येक अभंग व कविता केलेल्या प्रसिद्ध आहेत, तिन खानदेशातील भुसावळ तालुक्यां तील एदलाबाद या नांवाच्या पेट्याच्या ठिकाणा नजीक शके १२२० वैशाख वद्य ११ रोजी जलसमाधी घेतली. प्रसिद्ध चांगदेव हा या मुक्ता- बाईचा शिष्य असून त्यानें मुक्ताबाईचा उपदेश घेतला होता; इ. सन १६०० च्या सुमारास मोंगलाई अमलांत एदलाबाद है एक प्रसिद्ध ठाणे म्हणून होतें. या ठिकाणी मुक्ताबाईचे देवालय असून ते प्रसिद्ध आहे. + तेथें वैशाख महिन्यांत शिवरात्रीस मोटी यात्रा भरत असते. त्या प्रमाणेच एदलाबादेहून अजमासें सहा मैलांवर चांगदेव या नांवाचे एक गांव असून त्या ठिकाणीं तापी व पूर्णा या नद्यांचा संगम झालेला आहे. तेथे चांगदेव उर्फ चागदेव वटेश्वर या सिद्ध पुर- बाची समाधी असून दर महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरत असते. नेवासें हा गांव, श्रीज्ञानेश्वराने त्या ठिकाणी भगवद्गीतेवरील टिका लिहिली, त्यामुळे विशेष प्रसिद्धीस आला. तथापि त्या ठिकाणीं त्या पूर्वी ही एक प्रसिद्ध पुरुष निर्माण होऊन गेला होता; तो म्हणजे इ. सन १०४० च्या सुमा- रास होऊन गेलेला प्रसिद्ध ग्रंथकार श्रीपती हा होय. त्याने वैद्य शास्त्रावर कित्येक महत्वाचे ग्रंथ लिहिले आहेत; आणि ज्योतिर्गणितावर ही त्याने प्राकृत भाषेत लिहिलेला एक ग्रंथ अलीकडे उपलब्ध झाला आहे. मुकुंद राजानें आपल्या "विवेक सिंधू" या ग्रंथाच्या शेवटी ज्या प्रमाणे चैत्रपाळ


 + हल्लीं पंढरपूर येथे मुख्य खालील आठ पालख्या दरसाल जात अस- जात, त्या:- १ आळंदीहून ज्ञानेश्वराची २ देहूहून तुकारामाची ३ पैठणहून एक- नाथाची, ४ त्रिचकडून निवृत्तीनाथाची ५ एदलाबादेहून मुक्ताबाईची ६ मच्छंद्र- गडाहून मच्छेन्द्रनाथाची ७ सासवडहून सोपानदेवाची, व ८ आरणगांवाहून सांवतामाळयाची, या पालख्यांचे निघण्याचे दिवस व मुक्काम ठरलेले आहेत; व त्या सर्व काम वारकरी पंथाच्या मंडळीकडूनच बिनचुक व व्यवस्थेशीर होत असते; या पालख्या पंढरपुरास जात असतां मार्गात ठिकठिकाणाहून वारकरी लोक त्या मिरवणुकींत येऊन दाखल होत जातात, व या सर्व पालख्या दशमीच्या रात्री, आषाढी अथवा महाएकादशी करिता, पंढरपूर येथे जाऊन पोहोंचतात.