Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३६ )

सो मोठा विद्वान असल्याने संस्कृत भाषेतील वेदांत विषयावरील कित्येक मह त्वाच्या ग्रंथाचं त्यानें प्राकृत भाषेत रूपांतर केले असून त्यांत त्यानें स्वतःच्या ज्ञानाची ही भर घातलेली आहे. ज्ञानेश्वर हा अशा प्रकारचा अलौकिक पुरुष असूनही त्याचे ग्रंथ तीन शतकें अप्रसिद्ध स्थितींत राहिले, ही गोष्ट विशेष लक्षांत घेण्यासारखी आहे. हे ग्रंथ पुढें तीनशें वर्षांनी एकनाथानें स्वमताप्रमाणे दुरस्त करून प्रसिद्धीस आणिले. ज्ञानेश्वराच्या " भावार्थ दीपिका या ग्रंथांत भगवद्गीतेवर टिका केलेली असून शिवाय त्यांत अध्यात्म विषयाचेही मोठ्या मार्मिकपणानें विवेचन केले आहे. त्यामुळे त्या विषयाचा अभ्यास करणाराख तो ग्रंथ फारच उपयुक्त म्हणून मानिला गेलेला असून त्यास वारकरी पंथाच्या लोकांत तर विशेषच मान मिळत आहे. शिवाय "मराठी भाषेचा इतिहास" या दृष्टीने ही हा ग्रंथ विशेष महत्वाचा आहे. कारण प्राकृतांतील मूळरूपे, व कांहीं अपभ्रंश झालेली रूपे, यांचा त्यति समावेश झालेला आहे. एकनाथानें हा ग्रंथ शुद्ध केला, म्हणजे त्याची निरनिराळीं पाठां तरे पाहून, ज्ञानेश्वराचे हृद्गत कोणतें तें स्वमता प्रमाणे ठरवून त्या अनुरोधानें त्याने या ग्रंथांत दुरस्ती केली. हा ग्रंथ ज्ञानेश्वराने शके १२१२ या वर्षी लिहून पूर्ण केला, असे त्या ग्रंथाच्या शेवटील " शके चाराशर्ते बारोत्तरें ॥ तैं टिका केली ज्ञानश्वरें । सच्चिदानंद आदरें || लेखकु जाहला || १ || या ओवी वरून दिग्दर्शित होतं. ज्ञानेश्वरानंतर तीन प्रमाणे खुलासा केला आहे तो ॥ संवत्सरीं || एक जनार्दन अत्यादरीं || ग्रंथ पूर्वीच अति शुद्ध || परीं पाठतिरीं प्रति शुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ॥ २ ॥ या वरून एकनाथानें मूळ ग्रंथांत कशा प्रका- -रची दुरस्ती केली याची कल्पना करितां येते. ज्ञानेश्वराचे ग्रंथ, व अभंग, विशेष भक्त, वैराग्य, व ज्ञानपर, असून ते निरनिराळ्या विहंगम उपमा, रूपकें, व अलंकार, यांनी परिप्लुत आहेत. ज्ञानेश्वर हा आळंदी येथे शके १२१८ कार्तिक वद्य ८ स समाधिस्त झाला. त्या ठिकाणी दर वर्षी कार्तिक वद्य एकादशीस मोठी यात्रा भरत असते. ज्ञानेश्वराचा वडील भाऊ निवृत्तीनाथ हा शके १२२० पौष वद्य ११ रोजी नाशिक जिल्ह्यांतील त्रिंबकेश्वर या ठिकाणीं समाधिस्त झाला. खोपान देव द्दा शके १२१९ वैशाख शुद्ध ११ रोजी पुणे जिल्ह्यां- शतकांनी एकनाथानें या संबंधी खालील श्री शके पधराशे सहोत्तरीं ॥ तारणनाम गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली ॥ १ ॥ शुद्धभवद्ध || तो शोधूनियां एवं विध |