Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३५ )

हा पैठणजवळील आपेगाव येथील गोविंदपंत या नांवाच्या कुळकर्ण्याचा मुलगा असून विलपताची स्त्री रखमाबाई ही आळंदी येथील सिद्धोपंत कुळकर्णी या नांवाच्या एका ग्रहस्थाची मुलगी होती. विठ्ठलपंताने काशी क्षेत्रांतील रामा- नंद या नांवाच्या एका सिद्ध पुरुषाचा उपदेश घेऊन त्या स्वामी कडूनच सन्यास दिक्षा घेतली होती; परंतु पुढे रखमाबाईच्या विनवणी वरून त्याच स्वामीनी विलपतास पुन्हां गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली होती; व त्याप्रमाणे त्याच्याकडून पुन्हां गृहस्थाश्रम विला होता. विठ्ठलपंत हा आळंदी येथे येऊन गृहस्थाश्रमी बनल्यावर तो आपल्या सामुरवाडीस रहात होता. तेथे त्यात निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, व मुक्ताबाई, अशीं चार मुले झाली. यापैकी निवृत्तिनाथाचा जन्म शके ११९५ माधवद्य २, ज्ञानदे- वाचा शके ११९७ श्रावण वद्य ८, सोपानदेवाचा शके ११९९ कार्तिक शुद्ध १५, वं मुक्ताबाईचा शके १२०१ अश्वीन शुद्ध १, रोजी झाला असुन ह्रीं सर्व मुलें अत्यंत नीतिमान, सदाचरणीं व ईश्वर भक्तिपरायण अर्शी निपजलीं; व त्यांतल्या त्यांत ज्ञानेश्वर हा तर विशेषच अलौकिक पुरुष निर्माण झाला. तथापि ज्ञानदेव, सोपानदेव, व मुक्ताबाई, या तीघांनाही निवृत्तीनाथानेंच पहि- ल्यानें अध्यात्म विद्याज्ञानाची माहिती करून दिली; व त्यानंतर ज्ञानेश्वरानें स्वतःचें बुद्धिवैभव व अगाधज्ञान याच्या योगाने आपले नांव अजरामर करून ठेविलें. हीं चारी मुलें बालपणा पासून ज्ञानी, विरक्त, व ईश्वर स्वरूप-मन होतीं; तरी तीं सन्याशाची संतती, म्हणून ब्राम्हणांनी निवृत्तिनाथादि तीघां मुलांच्या मुंजी न करितां त्यांना जातीबाहेर ठेविले होते. पुढे ज्ञानेश्वराने पैठण येथे कांहीं दैवी चमत्कार दाखविल्यामुळे तेथीस ब्राम्हण मंडळींनी ही मुले सामान्य नसून देवांश आहेत असे समजून त्यांना शुद्धीपत्र दिले, व त्यांची क्षमा मागून या चारोही भावंडांना त्यांनी पुन्हां जातींत घेतले. हीं चारी भावंडे पहिल्यानें नगर जिल्ह्यांतील नेवाशे येथे व नंतर पैठण येथे येऊन राहिली होती. नेवारों येथे असताना ज्ञानेश्वरानें भगवद्वीतेवरील " भावार्थदीपिका " या नांवाची टिका लिहिली. याच ग्रंथीस " ज्ञानेश्वरी" हें नांव असून तो ग्रंथ आज तागाईल विशेष माननीय, मौल्यवान व महत्वाचा, म्हणून गगला गेलेला आहे. या शिवाय योगवाशिष्ट, अमृतानुभव, स्वात्मानुभव, पंचीकरण, व पासष्टी, वगैरे इतर ग्रंथही ज्ञानेश्वराने केलेले असुन तेही बरेच महत्वाचे व प्रसिद्ध आहेत. शिवाय