Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३३ )

कोंकण, या प्रांतावर स्वाऱ्या करून तेथील राजांनी आपल्या योग्य दाबांत जाणिलें; त्याप्रमाणेच त्यानें तैलप राजास त्याच्या गादीवर स्थापन केलें, व चोल राज्य आपल्या हस्तगत करून घेऊन गुजराथचा राज्यकर्ता विसल यांसही पूर्ण पराभूत करून टाकिले; शिवाय तो धर्मिक प्रवृत्तीचा असून त्यानें पुष्कळ यज्ञयाग करून त्या योगानें वैदिक कर्ममार्गासंबंधी जनतेची श्रद्धा दृढ केली होती. या कृष्णदेवानें कित्येक देशस्थ व कोंकणस्थ ब्राह्मणांस इनामे करून दिल्याचा -- व त्यांत पाटक, घेसास, पटवर्धन वगैरे उपनांवांचा उल्लेख आढळतो. लक्ष्मीदेव या नावाचा एक राजनीति कुशल पुरुष त्याचा मुख्य प्रधान असून त्यानंतर " मुक्ति मुकावली" या नावाच्या सुभाषित ग्रंथाचा कर्ता बहलण हा त्याचा मुख्य प्रधान झाला. शिवाय वेदांत सूत्रावरील टिकाकार अमला नंद हा ही या कृष्णराजाच्या दरबारी होता; कृष्णराज हा इ. सन १२६० या वर्षी मृत्यू पावला, व त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ महादेव हा गादीवर भाला. हा ही कृष्णदेवाप्रमाणेच शूर असून त्याने ही गुजराथ, कर्नाटक, कोंकण, वगैरे प्रांतावर स्वारी करून तेथील राजांचा पराभव केला होता. सिंघ 'नच्या कारकीर्दीत त्याने कोकणातील शिलाहार घराण्याचा पुष्कळ नाश केला होता, तथापि यावेळी त्या वंशाचा पूर्ण बॉमोड झाला नव्हता; व कोंकणचे ' शिलाहार राजे कसेबसे जीव जगवीत ठाणे येथे राज्य करीत होते; यावेळीं - सोमेश्वर या नांवाचा शिलाहार राजा गादीवर असून त्याच्यावर महादेवानें - स्वारी केली, व त्यास ठार मारून तें राज्य त्यानें आपल्या राज्यास जोडून टाकिलें. त्यानंतरच्या काळापासून कोकणप्रांताचा राज्यकारभार चालविण्यात यादवातर्फे दंडनायक अथवा प्रतिनिधीची नेमणूक होण्यास सुरवात झाली, व • पुढे कृष्ण या नांवाच्या भार्गव गोत्री ब्राहाणाकडे तिकडील कारभार सोपविण्यांत आला. महादेव हा मोठा धर्मनिष्ट व पापभीरू असून केशव या नांवाच्या काश्यप गोत्रीं ब्राह्मणाकडून त्याने आतोर्याम यज्ञ " करविला होता; शिवाय स्त्री, बालक, आणि शरणागत, याना कोणत्याही प्रकारचा यत्किंचितही उपसर्ग द्यावयाचा नाहीं, असा त्याचा नियम असून या बाबतींत त्याची कीर्ती होती. ..त्यामुळे भांध देशांतील लोकांनी, राजघराण्यातील एका स्त्रीस तेथील गादीवर बसविलें होतें, व माळवा प्रांतांतील राजाने आपल्या बाल युवराजास गादीवर