Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११२ )

व बंधू प्रमाणे पराक्रमी होता. त्यास सिंघणनं दक्षिणेकडील मुलुखाचा प्रतिनिधी नेमिलें होतें; व त्या वेळीं त्याने सर्व दक्षिण प्रदेशभर उत्तम बंदोबस्त ठेवून, व रद्द या नांवाच्या संस्थानिक मंडळीवर योग्य नियंत्रण ठेवूल, सिंघणा विरुद्ध कोणासही वर डोके काढण्यात त्याने अवसर मिळू दिला नव्हता. शिवाय त्याने गोर्वे प्रांतातील कदंब वंशीय राजास, पूर्वकालीन गुम राजवंशीयांस, पांडयास, आणि होयसल घराण्यास, पूर्णपणे सिंघणच्या अमलाखाली आणून टाकि होतें. सिंघण हा राजा महा प्रतापिव यशस्वी असल्यामुळे त्यास "पृथ्विवलम " " सकल पृथ्वी आश्रय " "राजा धिराज" "विष्णु वंशद्भव, " "द्वारावढी पुर- वराधीश्वर" वगैरे अनेक किताब असून त्याच्या राज्य ध्वजावर सुवर्ण गरुडाचे. चिन्ह होतें. शिवाय तो विद्वानांचा मोठा भोक्ता असून भास्कराचार्य पंडिताच्या धराण्यास त्याने आश्रय दिला होता. हे घराणे विद्वान म्हणून प्रसिद्ध असून भास्कराचार्याचा नातू व लक्ष्मीधराचा मुलगा चांगदेव, व भास्कराचार्याच्या श्रीपती या नांवाच्या भावाचा नातू व गणपतीचा मुलगा अनंतदेव, हे विद्वान पंडित त्याच्या दरबारी होते. हे उभयतां ही विशेष नामांकित ज्योतिषी असून त्यापैकीं चांगदेव याने पूर्व खानदेशांतील चाळिसगांक तालुक्यांतील पाटण या गांवीं भास्कराचार्याचा " सिद्धांत शिरोमणी " हा ग्रंथ शिकविण्या करिता एक मोठी पाठशाळा स्थापन केली होती, व अनंत देवाने तेथेंच शेजारीं भवानी देवीचें एक देवालय बांधिलें होतें. ( इ. सन १२२२ ) * शिवाय त्याचा प्रसिद्ध प्रधान हेमाद्री, याच्या पूर्वी त्या जागी असलेला श्री- करणाधीप अथवा मुख्य प्रधान सोषल याचा विद्वान मुलगा, व "संगित रत्नाकर " या ग्रंथाचा कर्ता शारंगधर हाही सिंघणाच्या भाश्रयास होता; याच राज्य- कर्त्याच्या कारकीर्दीत महाराष्ट्रांतील प्रसिद्ध भगवद्भक्त व खाधु पुरुष पुंडलीक हा निर्माण झाला; हा पुरुष महाराष्ट्रांतील मक्तिमार्गाचा आद्य प्रवर्तक असून त्यानेच इ. सन १२२८ मध्ये पंढरपूर येथे श्री विठोबाची स्थापना केली.
 सिंत्रण राजास, जैतुगी उर्फ जयपाल या नांवाचा एक मुलगा असून तोही माणेच परराक्रमी व विद्वान होता; परंतु तो त्याच्या हयातीतच मृत्यू पावला होता; त्यामुळे सिंघणच्या मृत्यूनंतर ( इ. सन १२४७ ) चेक पाळाचा मुलगा कृष्णदेव हा गादीवर बसला. त्याने अजमायें तेरा वर्षे राज्य केलें: व. तोही पराक्रमी व कर्तृत्ववान असाच निरजला, त्याने माळवा, गुजराथ, व