Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३१ )

याचा पराभव करून व त्रिपूर उर्फ तेबूर येथील कक्कल अथवा कोक्कल वंशाचे राज्य नष्ट करून आपल्या ताब्यांत घेतलें. त्या प्रमाणेच रंभागिरी येथील सिंह राज्यकर्ता लक्ष्मीधर यांस आपला मांडलीक करून मथुरा व काशी येथील राजा- सही त्यानें नामोहरम केले. या शिवाय होयसल वंशीय बल्लाळ राजास जिंकून त्याच्या ताब्यांतील दक्षिणे कडील प्रांत त्याने आपल्या हस्तगत करून घेतला, व पद्मनाल उर्फ पन्हाळा येथील शिलाहार उर्फ शेलार घराण्यांतील भोजराजास जिंकून पन्हाळा कोल्हापूरचें राज्य आपल्या नियंत्रणा खालीं आणिलें. ( इ. सन १२१५ ) कोल्हापूर पन्हाळ्याचे राज्य हस्तगत करण्यास तो आपल्या सैन्यासह दक्षिण महाराष्ट्रांत आल्यावर पहिल्याने सातान्याच्या आसपास त्यानें आपला तळ दिला होता. त्यावेळीं खटाव तालुक्यांतील मायणी या नांवाच्या गांवा लगत दोन ओढ्यांच्या संगमावर " संगमेश्वर " या नांवाचे एक देवालय त्याने बांधले, ते हल्लीं ही अस्तित्वात असून प्रसिद्ध आहे. त्या प्रमाणेच माण तालुक्यांत आपल्या नांवावरून सिंघणपूर या नांवाचे एक गांव त्यानें वसविल; व या ठिकाणीं त्यानें एक शंकराचे मंदिर बांधिल; हे स्थान "सिंघणापूरचा "महादेव" या नावाने हल्लीं प्रसिद्ध असून तें पुष्कळ मराठा मंडळाचे कुलदैवत आहे; कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा नाश केल्या नंतर त्यानें उत्तर कोंक- णांतील शिलाहार घराणें ही नामशेष केले, असा उल्लेख आढळतो. या सिंघणाने गुजराथ प्रांतावर अनेक स्वाऱ्या केल्या; या स्वायां मध्यें खोलेश्वर व त्याचा मुलगा राम या नांवाचे मुद्गल गोत्री ब्राह्मण त्याचे सेनापती होते. या वेळी गुजरा- येत चालुक्य अथवा सोळंखी घराण्याशी संबंध असलेले वाघेल या नावाचे घराणे राज्य करीत असून तेथील राज्यकर्ता लवण प्रसाद, व त्यांचा मुलगा बोर धवल हे आपणास स्वतंत्र राज्यकर्ते म्हणवू लागले होते. या उभयतांवर सिंघणाने स्वारी केली, व त्यांचा पराभव करून त्यांनी आपणा बरोबर तह करणं भाग पाडले; या वेळेपर्यंत लवणप्रसाद हा वास्तविक रित्या अनहिल पट्टण येथील राजा दुसरा भीम याचा मांडलिक होता; परंतु संघण यानें, दुसऱ्यानें गुजराथैवर स्वारी केली त्यावेळी वीर धवलचा मुलगा विसल देव हा राज्यावर असून त्यानें सिंघणच्या सैन्याचा मोठ्या निकराने प्रतिकार केला, व या युद्धांत त्याचा सेना- पती खोलेश्वराचा मुलगा राम हा मारला गेला. खोलेश्वरास या राम नांवाच्या मुलाशिवाय चिचणा या नांवाचाही एक मुलगा होता, व तो ही आपल्या पित्या,