Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३० )

काळांत या वंशांत भिल्लम व वोरबल्लाळ हे दोन राज्यकर्ते असून त्या पैक प्रत्येकाची इच्छा, सार्वभौम सत्ता आपल्या हाती असावी, अशी होती. त्यामुळे या उभयतांमध्ये मोठी निकराची स्पर्धा लागून अनेक युद्ध प्रसंग झाले, वे शेवटीं धारवाड जिल्ह्यांतील लकुंडी अथवा लोकिगुडी येथें एक निर्वाणीची लढाई झाली. तींत भिल्लमाचा पराजय होऊन त्याचा सेनापती चैत्रसिंह यांस पूर्णपणे माघार घ्यावी लागली. भिल्लमानंतर ( इ० सन ११८७ ते ११९१ ) स्याचा मुलगा चैत्रपाल उर्फ 'जैतुगी हा गादीवर आला; तो कर्तृत्ववान वं पराक्रमी असून त्याने " समस्तभुवनाश्रय " असा किताब धारण केला होता. त्यानें आंध्र उर्फ तैलंगण प्रांताचा क्रूर राजा रुद्रदेव यांस ठार मारून त्या प्रदेशावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. शंकरं या नांवाचा एक प्रसिद्ध योद्धा त्याचा सेनापती व दंडनायक असून महाप्रख्यात गणितशास्त्रज्ञ, च ज्योतिषी भास्करा- चार्याचा मुलगा लक्ष्मीधर हा त्याच्या पदरीं होता. शिवाय चैत्रपाल हा स्वतःच मोठा विद्वान असून त्यास वेद, तर्क शास्त्र व मिमांडा, यांचेही उत्तम ज्ञान होते; त्या मुळे लक्ष्मीधर पंडिताची दांडगी विद्वत्ता त्याच्या पूर्णपणे लक्षांत येऊन त्यानें त्यास आपल्या दरबारों सर्व पंडित जनांमध्ये अग्रस्थान दिले होतें. त्या प्रमाणेच प्रसिद्ध आय मराठी कवी मुकुंदराज हा ही त्याच्या पदरों होता, ही गोष्ट मुकुंदराजकृत " विवेकसिंधू" या ग्रंथाच्या शेवटी त्याने दिलेल्या " नृसिंहाचा बल्लाळ, त्याचा कुमार चैत्रपाळ, तेणें करविला हा खेळ, ग्रंथरचनेचा " या मज कुरावरून उघड होते. वैनगंगा उर्फ पयोष्णी नदीच्या तीरों मांगलाईत जोगाईचे अंबे, या नांवाचें एक गांव आहे, व येथील जोगाई देवी महाप्रसिद्ध आहे; हैं ठिकाण या मुकुंदराज कवीचें मूळ गांव असून तेथून निघून तो पुढे नेत्रपाळाच्या पदरीं येऊन राहिला. विवेकसिंधू शिवाय "परमामृत " या नांवाचा मुकुंदराजाचा दुसरा एक महत्वाचा ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहे.
 या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिंघण हा गादीवर आला. (इ०: सन १९९९ ते इ० सन १२१ पर्यंत कारकीर्द ) हा राज्यकर्ता मोठा पराक्रमी असून याच्या कारकीर्दीत यादवांच्या ऐश्वर्याची व सत्तेची अतोनात वृद्धी. झालो. याने माळव्याचा राजा अर्जुन यास नामशेष करून भोजराजाष्ठ अंकित होगे भाग पाटि, नंतर त्यानें चेदी प्रांतातील छत्तिसगड येथील राजा जज्जल,