Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२९ )

कारकीदींच्या अखेरीपर्यंत चालुक्य घराण्यांतील सत्तेवर वर्मी घाव घालण्यास अनुकूल अशी एक ही संधी त्याने यादवांना मिळू दिली नव्हती; परंतु विक्रमा- दित्याच्या मृत्यूनंतर नालायकांची परंपरा गादीवर आली, आणि कलचुरी वंशांतील दंडनायक विज्जल यानें तैलपास पदभ्रष्ट करून चालुक्य घराणे नामशेष केल्यानंतर, धर्मक्रांती होऊन, त्यामुळे उत्पन्न झालेल्या बेबंदशाहीचा, याद- वांनी पूर्णपणे फायदा करून घेतला. यावेळी चालुक्य घराण्यांतील अगर्दी वटचा कमकुवत राजा चवथा सोमेश्वर हा गादीवर असून इकडे यादव घरा- यांतील विष्णुवर्धनचा नातू वीरबल्लाळ हा पराक्रमी पुरुष गादीवर होता. त्याने चवथ्या सोमेश्वराचा सेनापती बोम्मा उर्फ ब्रह्मा याचा पूर्णपणे मोड करून सोमेश्वराचे बहुतेक राज्य जिंकून घेतलं; तथापि सेऊणदेशाच्या यादव कुलामध्ये सर्वात अत्यंत पराक्रमी पुरुष म्हटला म्हणजे वीर बल्लाळचा चुलता भिल्लम हा होय. त्यानें मंगलवेष्टक (मंगळ वेदें; हा गांव हल्ली सांगली संस्थानाच्या अमलाखालीं आहे.) येथील विलण राजास नामशेष करून, आणि वीर बल्लाळ यादव, सोमेश्वर चालुक्य, या दोघांचाही पाडाव करून, आपल्या वंशाचे नवीन राज्य स्थापन केले, व देवगिरी उर्फ दौलताबाद ही आपल्या राज्याची राज- धानी करून त्या ठिकाणीं इ. सन ११८७ मध्ये आपणास राज्याभिषेक करवून घेतला. हे घराणे पुढे महाराष्ट्रांत अत्यंत प्रतापशाली म्हणून प्रसिद्धीस आले. या यादव घराण्याची दुसरी, म्हणजे होयसल यादव या नावाची शाखा, कर्ना- टक प्रांतामध्ये राज्य करीत होती, व कृष्णानदीच्या दक्षिणेकडील प्रदेशावर तिन्हा अंमळ चालत होता. पुढे अल्लाउद्दीन खिलजी याच्या कारकीर्दीत त्यांने आपला प्रसिद्ध सेनापति मलिक काफूर यांस कर्नाटकच्या मोहिमेवर पाठविलें; त्याप्रमाणे तो दक्षिणेतून देवगड, व पैठण या मार्गानें तिकडे गेला; सावेळी या होयसल यादव घराण्यांतील बल्लाळ या नांवाचा राजा तेथे राज्य करीत होता; काफूर यानें- कर्नाटकच्या मध्यभाग श्रीरंगपट्टणन्या वायव्य दिशेस सुमारें शंभर कोसावर असलेल्या त्याच्या द्वीपसमुद्र अथवा इबीड या नावाच्या राज- धानीवर हल्ला करून तैं शहर काबीज केले, व हे धराणं नामशेष करून तें सर्व राज्य मुसलमानी राज्यांत, सामील केलं
 वरील विवेचनावरून, यादव वंशाच्या दोन शाखांनी दोन ठिकाण आप आपली स्वतंत्र राज्य स्थापन केली होतीं, हें लक्षात येईल. या