Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२८ )

संस्थानिक असल्यामुळे त्यांचे तत्कालिन इतिहासांत व राजकीय घडामोडींत फारसे महत्व नव्हते; तथापि यादवांची एक शाखा द्वारसमुद्र न्हणजे म्हैसूर प्रांतांतील हळेबीड येथे राज्य करोत होती. या शाखेस दोयसल यादव असे म्हणतात. या घराण्यांतील मूळ पुरुष व पहिला राजा वित्तिदेव चित्तिंग हा असून त्याने हळेबीड येथे आपले राज्य स्थापन केले होते; याची कारकीर्द इ. सन १९९१ पासून ११४१ पर्यंत म्हणजे तीस 'वर्षाची होती. तो पहिल्याने जैन धर्मानुयायी होता, व त्याने आपला प्रधान गंगराज यांजकडून अनेक जैन मंदिर ही पांचविली होती. नवव्या शतकाच्या प्रारंभी शंकराचार्याने वेदात मागांचे प्रतिपादन करण्यास निरनिराळ्या पंथ सांप्रदायांत धर्मैक्य घडवून आणण्यास, व अद्वैत मताचा प्रसार करण्यास मुर- वात केली; तथापि त्या मुळे हे निरनिराळे पंथ व सांप्रदाय कमी न होता उलट ते वाढतच गेले; शंकराचार्याच्या काळा पूर्वी पाचव्या शतकांत माळवा प्रांतां- तील अवंती उर्फ उज्जयनी नगरीत चंद्रगुप्त, कुमारगुप्त, स्कंदगुप्त, वगैरे पराक्रमी व भागवत धर्माचे पुरस्कर्ते राजे निर्माण होऊन गेले, व ते भागवत धर्माचे रक्षक व प्रसारक असल्याने त्यांनां " परम भागवत " अशी संज्ञा प्राप्त झाली. त्या प्रमाणेच शंकराचार्याच्या काळा नंतर ही रामानुज, विष्णूस्वामी, निंबार्क, आणि मध्व, हे भागवत धर्माचे पुरस्कर्ते निर्माण झाले. त्यापैकी रामनुज ( इ. सन १११६ ते इ. सन ११३७ ) दां वित्तिंग ( इ. सन ११११ ते इ. सन १९४१ पर्यंत) चा बराचसा समकालीन भागवतधर्म प्रचारक होता. त्याच्या उपदेशानं वित्तिंग यानें जैनधर्माचा त्याग केला, व तो भक्ति- मार्गी व वैष्णव धर्माचा उपासक बनला; त्या नंतर त्याने आपल्या राजधानीच्या ठिकाण व राज्यांत ठिकठिकाणीं श्री विष्णूची मंदिर बांधविली; इतकेच नन्हें तर आपले पूर्वीचे नाव वित्तिदेव उर्फ विनिंग बदलून त्याने विष्णुवर्धन हें नर्वे नांव धारण केलें. तो मोठा पराक्रमी असून त्याने आपल्या घराण्याची सत्ता पुष्कळच वाढविली; त्यांच्या मनांत दक्षिणेचे राज्य संपादन करण्याचे विचार घोळत होते, व त्या उद्देशाने दुसन्या विक्रमादित्याच्या कारकीर्दीत त्याने चांडक्यांच्या तव्यातील प्रदेशावर स्वारी ही केटी होती; परंतु विक्रमादित्य हाही विशेष पराक्रमी व बलाढ्य असून त्याने विष्णु वर्धन याचा पूर्ण पराभव करून त्यास माघार घेणे भाग पाहिले होते; इतकेच नन्हें तर विक्रमादित्याच्या