Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२७ )

घराण्यांतील होती; त्यामुळे त्या घराण्याशी ही त्याचा परंपरेने संबंध जडला होता. भिल्लनानंतर वसुगी, अर्जुन, व भिल्लन तिसरा, हे राज्यकर्ते झाले. त्यापैकी मिलमानें चालुक्यवंशीय जयसिंह याच्या मुलीशी लग्न केले होतें. भिलमानंतर वादुगी, मुगी, भिलम दुसरा, व सेऊणचंद्र चवथा, याप्रमाणे राजे गादीवर आले. त्यांत दुसरा सेऊणचंद्र हा विशेष पराक्रमी असून तो चालुक्य घराण्यांतील प्रसिद्ध राजा दुसरा विक्रमादित्य याचा समकालीन व स्नेही होता; इतकेंच नव्हें तर विक्रमा- • दित्यास जेव्हा त्याच्या शत्रूंनी चोहोंकडून पूर्णपणे घेरून टाकिलें, त्यावेळी या सेऊण चंद्रानेच त्यास अमोल्य मदत देऊन या संकटातून मुक्त केले, व त्याची पुन्हा गादीवर स्थापना केला, असे व्रत खंडांत वर्णन केलेले आहे. त्याच्या मागून त्याचा मुलगा परमदेव, व त्यानंतर त्याचा मुलगा सिंहराज हा पुत्रसंतान विर- हीत वारल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ, व त्यानंतर त्याचा मुलगा मलगी, हा गादीवर आला; त्यांपैकी मलगी हा बराच परक्रमी असून त्याने पर्णखेट या नावाचे शहर आपल्या शत्रू पासून जिंकून घेतलें, आणि तिकडे असताना उत्कल झणजे भोदीक्षा देशाच्या राजाच्या संग्रहीं असलेला हत्तींचा एक मोठा नामांकित कळप ही त्याने त्याच्याशी युद्ध करून हिरावून आणिला; त्यानंतर त्याचा मुलगा अमरगंगेय, व नंतर गोविंदराज, मलगीचा मुलगा अमर झलगी, बल्लाळ अथवा कालीय बल्लाळ, ( कारकीर्द इ. सन ११८७ ते ११९१) या नावाचे राजे अनुक्रमे गादीवर आले. पुढे यादवांचे राज्य इ. सन ११९१ मध्ये होयसल यादव कुलांतील वीरबल्लाळचा चुलता भिल्लम पांचवा यांजकडे 'आल्यावर त्याने चालुक्यांचें राज्य जिंकून घेतले. भिल्लमच्या कारकीर्दी पर्यंत यादव घराणं चालुक्यांचे मांडलीक राज्यकर्ते म्हणून होते; परंतु यादव वंशातील भिल्लम हा अत्यंत सामर्थ्यवान व पराक्रमी पुरुष निपजून त्याने चालुक्य वंशाचा शेवट केला, व आपल्या कर्तृत्वाने यादव घराण्याकडे श्रेष्ट सत्तेची सर्व सूत्रे आणिली.
 या यादव घराण्यास इ. सन ७९५ च्या सुमारा पासून सुरवात होते, त्या वेळेपासून पांचव्या वल्लभापर्यंत एकंदर बावीस राजे इ. सन ११९१ पर्यंत गादीवर आले व या घराण्याने एकंदर अजमासें ३९५ वर्षे राज्य केलें. याद- वाच्या पूर्वी राष्ट्रकूट व उत्तरकालीन चालुक्य घराणे दक्षिणेत सार्वभौमत्वाचा श्रेष्ट अधिकार उपभोगीत असून त्या काळात यादव हे निवळ मांडलीक