Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२६ )


हिरावून घेतल्या नंतर ती सत्ता त्या घराण्याकडे इ० सन १९७२-७३ पर्यंत म्हणजे अजमास दोनशे वर्षे निर्वेधपणे टिकली. परंतु या वेळी म्हैसूरच्या गंग या नांवाच्या घराण्यांतील राजा बल्लाळ दुसरा, आणि चालुक्य राजा याच्या मध्ये वैमनस्य उत्पन्न होऊन जोराचे युद्ध प्रसंग घडून आले; त्यावेळी चालुक्यांनी देवगिरो येथील यादव राज्यकर्ता सिंघण याची मदत घेतली; व बल्लाळाशी पुष्कळ काळ पर्यंत युद्ध चालू ठेविले, आणि त्याच्याच मदतीने अखेरीस बल्लाळांचा पूर्ण पराभव केला. परंतु या युद्धामुळे आधींच कमकुवत होत चाललेल्या चालु- क्याची सत्ता परमावधीची कमकुवत झाली, व त्याचा परिणाम अवेरीस असा झाला की यादव उर्फ जाधव राज्यकर्ता सिंघण याने चालुक्य घराणे नामशेष करून सर्व सत्ता आपल्या हस्तगत करून घेतली. हे यादव घराणे मूळचे रजपूत असून ते मधुरेचे राज्यकर्ते होते; व श्रीकृष्णाच्या काळा पासून ते द्वारावतीचे म्हणजे द्वारकेचे राज्यकर्ते असून पुढें सुबाहूचा मुलगा दृढप्रहार याच्या वेळेपासून ते दक्षिण प्रांताचे राज्यकर्ते झाले, असा प्रवाद आहे. ( अज-मार्से इ० सन ७९५ ) तथापि या घराण्याची थोडीशी माहिती सुबाहू या नांवाच्या राज्यकर्त्याच्या वेळेपासूनच कायती उपलब्ध होत आहे. या सुबाहूस चार मुलगे असून त्यानें आपले सर्व राज्य त्यांना वाटून दिले होते. त्यांत त्याचा दुसरा मुलगा प्रहार यांस दक्षिणेकडील प्रदेश मिळाला होता. त्याच्या राज- धानीचे शहर चंद्रादित्यपूर या नांवाचे असून तेच हल्लींचे नाशिक जिल्हयांतील ( लासलगाव रेल्वे स्टेशनपासून सडकेने चौदा मैलावर असलेले तालुक्याचे ठिकाण ) चांदवड हें असावें, असा तर्क आहे. दृढप्रहारानंतर त्याचा मुलगा - सेऊणचंद्र हा गादीवर बसला; या राजाच्या नांवा वरून नाशीक पासून देवगिरी उर्फ दौलताबाद पर्यंतच्या प्रदेशाचे नांव "सेऊण देश " असे पडले, व खानदेश - मुसलमानी अमलाखाली जाण्यापूर्वी त्यास ही " सेऊण देश " हे नामाभिधान मिळाले म्हणजे मुसलमानी भमदानी पूर्वीच " सेऊण देश" हेंच खानदेशचे -नाव होय, - सेऊणचंद्रानंतर धाडियाप्पा, मिल्लम, श्रीराम, अथवा राजगी, बद्दिग; अथवा बादुगी, धाडियस, व भिल्लम दुसरा, हे अनुक्रमे गादीवर आले. त्यांतील भिल्ल हा विशेष पराक्रमी असून याच्याच काळात त्याच्या घराण्यार्शो शिलाहार -राजघराण्याचा शरीर संबंध ब्रडला. त्याने झंझशिलाहार याची कन्या नामें लस्थि यव्या हिच्यार्थी विवाह केला. शिवाय तो राजकन्या मातेच्या पक्षाकडून राष्ट्रकूट