Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२५ )

तल्ले चोहोंकडे प्रतिपादन करण्यास सुरवात केली; आणि या नवीन धर्माचा अंगिकार करणान्या जंगम लोकांच्या सुख सोयी साठीं सरकारी खजिन्यांतून पाहिजे तसा पैसा खर्च करण्याचा सपाटा चालविला. परंतु आपल्या जामदार खान्यांतील संपत्तीचा अशा रीतीनें एक सारखा व्यय होणं विज्जल राजास आव- डलें नाहीं; शिवाय मंचष्णा या नांवाचा विज्जलाचा दुसरा एक प्रधान होता; त्यासही ही गोष्ट नापसंत होती; त्यामुळे त्यानेही विज्जलाचें मन बसवाणा विरुद्ध कलुषित करण्यांत बाकी ठेविली नाहीं; तेव्हां अर्थातच त्या उभयतांमध्ये वैमनस्य: उसन्न झाले व विज्जलानें वसवाप्पास कैद करण्याचा घाट घातला; परंतु ही बातमी त्यास अगाऊच लागल्यानें तो विज्जलाच्या हांतून निसटून पळाला. तेव्हां त्यास पकडण्याकरितां विज्जलानें त्याच्यावर आपली माणसें पाटविली. व शेवट त्यानेही स्वतः त्याचा पाठलाग केला. परंतु या मोहिमेंत विजल यांस अपयश येऊन पूर्णपणे माघार घेणें भाग पडलें, त्यानंतर लवकरच बसवाप्पानें विज्जल यांस पकडून त्याचा वध केला; परंतु त्यामुळे एक मोठे बंड उद्भवून सर्व कल्याण शहरभर प्रेताचे ढीग पडले, व बसवाप्पानेही मलप्रभा नदींत जलसमाधी घेतली; तथापि त्याचा भाऊ चिनत्रसवाप्पा याने लिंगाईत धर्माचा प्रसार चालू ठेवून तो पंथ वृद्धिंगत केला.
 बसवाप्पा याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा सोवीदेव हा गादीवर आला. याच्या कारकीर्दीत दुसन्या तैलपाचा मुलगा सोमेश्वर चवथा याने कलचुरी वंशिया पासून आपल्या पूर्वीच्या राज्यांपैकी बराच भाग जिंकून आपल्या हस्त- गत करून घेतला; ( इ. सन १९८२ ) बाकी राहिलेला उत्तरे कडील भाग यादवांनी जिंकून आपल्या राज्यात सामील केला; आणि अशारीतीनें कलचुरी वंशांचे राज्य अल्पकाळांतच नष्ट झाले. थोडक्यांत म्हणजे उत्तर कालीन चालुक्य घराण्याने इ० सन ९७३ पासून १०९० पर्यंत, आणि कलचुरी घरा-- ण्याने इ० सन ११६५ ते ३० सन १९८२ पर्यंत, दक्षिणचे राज्य केलें, व त्या नंतर हीं दोन्हींही घराणी नामशेष झाली.
 या बाबतीत दुसरा असाही उल्लेख आढळतो, कीं, इ० सन ९७३ च्या सुमारास चालुक्य घराण्यातील राजा दुसरा तैलप याने देवगिरी येथील यादव उर्फ जाधव राज्यकर्त्याच्या मदतीने राष्ट्रकूट घराण्यांतील राजसत्ता आपल्या घराण्यांत