Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२४ )

 अशा रीतीने तैलप हा आपल्या राज्यांतून निघून गेल्याचीं हकीकत विजल यांस कळली, तेव्हां त्याला एकप्रकारें विशेष आनंद झाला; कारण स्वतः राज्यकर्ता होण्याच्या मार्गांत त्यास तैलप हा एकटाच कायतो अडथळा शिलक होता; परंतु तो अशा प्रकारें दूर झाल्यामुळे, कोणत्याही कष्टसायासा शिवाय अथवा कटकटी भानगडी शिवाय, स्वतःला पूर्ण राज्यधिकारी बनण्याची, आणि म्हणवून घेण्याची त्यास योग्य संधी प्राप्त झाली; व त्यानें त्या प्रमाणे इ. स. १९६५ मध्ये राज्यापद धारण केलें; त्यामुळे अर्थातच उत्तर कालीन चालुक्य राज्य नष्ट होऊन कलचुरी उर्फ हैहय घराणें अधिकारारूट झालें. (इ. सन ११८९ )
 तथापि विज्जल यार्ने कोटिल्याने मिळविलेले हे राज्य त्याच्या वराण्या- कडे उणेपुरे पंचवीस वर्षेच कायते टिकले, आणि त्या नंतर तें धर्मक्रांतीच्या भोंवऱ्यांत सांपडून लवकरच त्याचा अंत झाला.
 या काळांत लिंगाईत धर्म जोरांत येऊन बतव अथवा बसवाप्पा या नांवाच्या एका शूर व कर्तृत्ववान मनुष्याने या धर्मक्रांतीचं प्रमुखत्व आपणांकडे घेतले. हा जातीचा ब्राम्हण असून तो कर्नाटक प्रांतांतील बागेवाडी येथील मूळ राहणारा होता; आणि वशिला व योगायोग यामुळे तो वैभवास चढला होता. त्याचा मामा बलदेव हा विज्जल राजाचा प्रधान असून त्यानें आपल्या या भाचास आपली मुलगी दिली होती; त्यामुळे, मामा, व सासरा, असें वसवाप्पाचे बलदेवाशीं जोडनातें होतें. बलदे- वाच्या मृत्यू नंतर विजल यानें वसवाप्पा याची आपल्या मुख्य प्रधानाच्या जागे वर नेमणूक केली; या बसवाप्पास पद्मावती या नांवाची एक बहीण असून ती अत्यंत रूपवती होती. त्यामुळे विजल तिच्यावर मोहित झाला, व बसवाप्पाच्या अनुमतीनें त्यानें तिच्याशी विवाह लाविला. उलटपक्षीं विज्जलानें आपली बहिण नीललोचना, ही, बसवाप्पास विवाहांत दिली होती, अशा आशयाच बसव पुराणांत वर्णन केलेले आहे. बसवाप्पा हा लिंगाईत धर्माचा विशेष अभि मानी असून त्या धर्माचा होईल तितका विस्तार करावा, असा त्याचा प्रयत्न होता; म्हणून त्यानें आपला भाचा, म्हणजे आपली दुसरी बहिण नामे नागला- चिंका हिचा मुलगा चनबसवाप्पा उर्फ चनबसवच्या याच्या मार्फत या धर्माची