Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२३ )

शास्त्र, वैद्यकशास्त्र, अवशिक्षा, श्वानशिक्षा, गजशिक्षा, वगैरे शास्त्र व कला, या संबंधीं त्यांत विषद रीतीनें विवेचन केलें आहे; शिवाय त्यांत पंचाग तयार करण्याकरितां प्रत्येक ग्रह व तारा यांची स्थानें गणितार्ने निश्चित करण्यासाठी घेतलेल्या आद्य दिवसासंबंधीं जें वर्णन केलें आहे, त्यांत " चालुक्य (कुळ) भूषण सकल शास्त्राच्या अर्थ सर्वस्वान्धीला आटविणारा जणु दुसरा अगस्त्य मुनीच, व सर्व शत्रूचा संहार कर्ता असा जो राजा सोम (सोमंश्रर) समुद्रवल- यांकित पृथ्वीचे राज्य करीत असतां शकनृप कालाची वर्षे दहा एकावन्न अतित होऊन सौम्य नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध प्रतीपदा शुक्रवार, ' " असा उल्लेख आहे; व यावरून सोमेश्वर गादीवर आल्यावर चवथ्या वर्षी त्याने हा ग्रंथ रचिला, असे उघड होत आहे; या पराक्रमी व पंडित राज्यकत्यानें थोडीं वर्षों पण उत्तम रीतीनें राज्य केलें; इ० सन ११३८ मध्ये तो मृत्यू पावला; व त्याचा मुलगा जगदेव मल हा गादीवर आला; त्यानंतर, त्याने बारा वर्षे राज्याचा उपभोग घेतल्यावर, त्याचा भाऊ त्रैलोक्य मल्ल उर्फ तिसरा तैलप हा गादीवर आला; ( इ. सन ११५० ) व त्यानें पंधरा वर्षे, म्हणजे इ. सन १९६५ पर्यंत राज्य केले; तथापि सोमेश्वराच्या मृत्यूनंतर लागलीच त्या घराण्यास उतरती कळा लागण्यास सुरवात झाली. ही संधी साधून, त्या राज्याचे तुकडे करण्याच्या इराद्यानें, त्याच्या नियंत्रणा खालील संस्थनिक मंडळी पैकों कित्येकांनी प्रयत्न आरंभिले; तिसऱ्या तैलपाच्या कार- कीर्दीत कलचुरी घराण्यातील विज्जल अथवा विज्जण या नांवाचा एक संस्थानिक स्वतःच तैलपाचा मुख्य सेनापती अथवा दंडनायक होता; त्यानें तैलपास पदभ्रष्ट करून स्वतः राज्य बळकाविण्याचा गुप्त कट केला, व त्यांत आसपासचे संस्थानिक व कोल्हापूर येथील शिलाहार वंशांतील राज्यकर्ता महामंडलेश्वर विजयार्क याची मदत घेऊन तैलपास आपल्या नियंत्रणाखालीं आणून ठेविले; परंतु अशा परतंत्र व दुखःदायक स्थितीमध्ये राहणे त्यास न आवडून तो एक दिवस संधी साधून आपल्या राजधानीचे शहर जे कल्याण, ( हे ठिकाण सोलां- पूर व बेदर यांच्या दरम्यान बेदरच्या पश्चिमेस सुमारें चाळीस मैलावर आहे. ) तें सोडून धारवाड जिल्ह्यांतील अण्णेगिरी या नांवाच्या गांवीं गेला, व तेथे त्याने आपले एक निराळेच राज्य स्थापन केलें;