Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२२ )

ठेविले; शिवाय तो मोठा पंडित असून त्याने लिहिलेला " मानसोल्लास अथवा " अभिलषितार्थ चिंतामणी " हा ग्रंथ सर्वमान्य व त्याच्या विद्वत्तेचे द्योतक म्हणून प्रसिद्ध आहे; व त्यावरून त्यास "सर्वभूप" अशी पदवी प्राप्त झाली आहे. या ग्रंथांत अनेक निरनिराळ्या विषयांची पुष्कळ माहिती दिली असून त्याचे पांच भांग केले आहेत; त्यापैकी पहिल्या भागांत, राज्य संपादन करण्याला जे गुण कारणीभूत होतात ते सांगितलेले आहेत. दुसऱ्यात, कोणी पुरुषाने राज्य मिळविल्यानंतर तो तं रक्षण करण्याला ज्या कारणीभूत सायनांनी समर्थ होतो, तो साधने सांगितलेलीं आहेत. तिसन्यांत, कोणीही राजाने आपली सत्ता सुदृढ केल्यावर त्याला उपभोगाचे अथवा सुखाचे जेजे प्रकार लभ्य असतात ते सांगितले आहेत; चवथ्यांत, मानसिक आनंद ज्यापासून होतो, त्या व्यवसायाचे अथवा करमणुकीचे प्रकार सांगितलेले आहेत; ह्या प्रत्येक भागांतील विषयांचे वीस बोस उपभेद अथवा उपभाग केलेले आहेत. पहिल्या भागांत अनृताचा त्याग, दुलऱ्यात दु.ख किंवा पीडा देण्यांच्या प्रवृत्तीचे सर्वदा वर्जन, इंद्रीय निग्रह, महात्मता, सौजन्य, देवावर श्रद्धा, दरिद्री व पंगू, मित्र व स्वपक्षीय, यांस अन्नदान व आश्रय देणे, इत्यादी सद्गुणांचा समावेश केला आहे. दुसऱ्या भागांत ज्या कशाला सात अंगे असे म्हणतात, तीं वर्णिलेली आहेत; म्हणजे सर्वोत्कृष्ट राजा, त्याचे प्रधान, पुरोहित, व ज्योतिषी. जामदारखाना, तो रिकामा झाला असतां पुन्हां भरण्याचा मार्ग, सैन्य, इत्यादिकांचा समावेश केला आहे. तिसन्या भागांत उपभोगाचे प्रकार, म्हणजे सुंदर राजमंदीरें, जलक्रीडा, अभ्यंजन, बहुमोल वस्त्र, अलंकार भूषणे, इत्यादिकांचं वर्णन आहे. चवथ्या भागांत फावल्या वेळींच्या व्यवसायाचे, म्हणजे करमणुकीचे प्रकार- शिपाईगिरीच्या कसरती, घोड्यावर बसणें, हत्तीस शिकविणे कुस्ती करणे, कोंब ड्यांच्या झुंजी लावणे, कुपात शिकविणे, कविता करणं, गाणे, संगित गान - नृत्य इत्यादि प्रकार-ग्रंथित केलेले आहेत; आणि शेवटच्या म्हणजे पांचव्या भागांत क्रीडांचे प्रकार-उद्यानक्रीडा, वनकंडा, पर्वतक्रीडा, पुलिनक्रीडा, नाना प्रकारचे खेळ, स्त्रीसमागमोपभोग वगैरे प्रकार दिग्दर्शित केले आहेत.सारांश, वरील सर्व विषयासंबंधी संस्कृत भाषेत असलेल्या विद्या व कला यांच्या पैकी बहुतेक सर्वाची मूलतत्वें या ग्रंथांत वर्णिलेली आहेत; आणि राजनीती, ज्योतिष, फलज्योतिष, अलंकार शास्त्र, छदशास्त्र, गांधर्वविद्या, चित्रकला, शिल्प-