Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२१ )

परंतु अशा या अत्यंत आपत्तीच्या व आणीबाणीच्या वेळीं त्याच्या विशेष शूर व एकनिष्ठ अशा आंचगी या नावाच्या एका सेना नायकाने आपल्या जिवावर उदार होऊन शत्रू पक्षाची मोठ्या निर्माणी के युद्ध केले; त्यामुळें विष्णुवर्धन व त्याचे इतर मदतगार राज्यकर्ते यांचा पूर्णपणे पराजय होऊन विक्रमादित्य विजयी झाला, व त्यानें कोंकण व गांवें हें प्रांत आपल्या प्रभुत्वाखाली आणिले. विक्रमादित्याचा हा आंचगी सरदार मोठा लढवल्या व पराक्रमी असून ह्या काळापर्यंत त्यानें अनेक लढायांत आपले युद्ध कौशल्य पूर्णपणे प्रगट केले होते, व याच सरदारास पूर्वी विक्रमादित्यानं कलिंग, बंग, नरू, गुर्जर, मालव, चेर, चोल व द्वार समु द्राचे बल्लाळ, वगैरे राज्यकर्त्यांवर मोहिमेस पाठवून त्याच्याच कर्तृत्वांमुळे त्यांना विक्रमादित्याचे अंकितत्व मान्य करणे भाग पडले होतें.
 विक्रमादित्य हा जसा अतीशय शूर व पराक्रमी होता, तसाच तो विद्वा नांचा संग्रहकर्ताही होता; प्रसिद्ध " मिताक्षरा " या नांवाच्या धर्मनीति व व्यवहारनीतियुक्त ग्रंथाचा कर्ता, व प्रख्यात पंडित, विज्ञानेश्वर, आणि काश्मीर येथील विद्वान व बहुश्रुत, "विक्रमांकदेव चरित्" या प्रसिद्ध काव्याचा कर्ता विल्हण कवी, हे त्याच्या आश्रयास होते; त्याच्या राजधानीचे शहर कल्याण हे असून, त्याचे राज्य त्याकाळांत अतशय भरभराटीत होते; विक्रमा- दित्य हा मोठा उदार, दानवर व गरिबांचा कैवारी असून त्याच्या कारकीर्दीत त्याच्या भरवशावर प्रजाजन इतके निर्धास्थ असत की, "ते रात्रीं आपल्या घरांची दारे मुद्धा बंद करण्याची काळजी ठेवीत नसत," असं त्याच्याविषयीं बिल्हण कवीनें वर्णन केले आहे. वरील एकंदर विवेचना वरून उत्तर काळा- तील चालुक्य घराण्यामध्ये विक्रमादित्य हा किती पराक्रमी, शूर, कर्तृत्ववान, विद्वद्वत्नसंग्रही व महान श्रेष्ट राज्यकर्ता होऊन गेला, याची सहज कल्पना करितां येते.
 विक्रमादित्य हा इ. सन १९२६ मध्ये मृत्यू पावला व त्याचा मुलगा सोमेश्वर (तिसरा) अथवा भूलोक मल हा गादीवर आला; तोही आपल्या वडि- लाप्रमाणे शूर व कर्तृत्ववान असून स्वतः ही विद्वान व राजनीतिज्ञ होता; त्यानें आपल्या कारकीर्दीत आंध्र, द्रविड, मगध, व नेपाळ, येथील राज्यकर्त्यांबरोबर युद्ध करून, त्यांचा पराभव केला, व त्यांना आपल्या नियंत्रणाखालीं आणून