Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२० )

विरुद्ध युद्ध करण्यास प्रवृत्त केले; तेव्हां जयसिंहाने आपल्या शत्रूच्या नाद लागून आपल्या भाषा विरुद्ध लढण्याची जंगी तयारी केली, व आपल्या कटांतील सर्व राजेरजवाड्यांच्या व आपल्या सैन्यासह तो मोठ्या झपाट्याने राजधानी सोडून कृष्णा नदीच्या तीरीं येऊन तळ देऊन राहिला. विक्रमादित्यास ही सर्व हकीकत कळल्यावर आपल्या धाकट्या भावाच्या या विश्वासघातकी कृत्या बद्दल त्यांस फार आश्चय वाटले; तथापि ती आश्चर्य अथवा विचार करीत अस ण्याची वेळ नव्हती त्यामुळे तो मोटया झपाट्याने या सैन्याशी तोंड देण्यास आपल्या जोरदार सैन्यासह त्या ठिकाणी येऊन दाखल झाला. पुढे उभयतांच्या सैन्यामध्ये मोठ्या निकराचे युद्ध होऊन त्यांत जयसिंह आणि त्याचे साह्यकारी दोस्त यांचा पूर्णपणे पराजय झाला, व जयसिंह हा तर आपला जीव जगविण्या- करिता संमरभूमी सोडून पळून गेला. या निर्णयात्मक जयामुळे विक्रमा दित्याच्या कीर्तीत विशेष भर पडली, व त्यास अतीशय लूट मिळून सांपत्तिक दृष्ट्याही त्याचा पुष्कळ महत्त्वाचा फायदा झाला.
तथापि नरही विक्रमादित्यास शांततेचा काळ लाभला नाहीं, व आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतही त्यास आपल्या शत्रू बरोबर युद्ध संग्राम करीत राहण्याशिवाय गत्यंतर उरलें नाहीं. विक्रमादित्याच्या कारकीदींच्या अबेरीच्या सुमारात विष्णुवर्धन या नांवाचा एक यादव कुलांतील राज्यकर्ता द्वार समुद्र म्हणजे म्हैसूर प्रांतावर राज्य करीत असून तो विक्रमा- दित्याचा शत्रू होता. तो यावेळी त्याच्या विरुद्ध पुढे आला, आणि त्यानें पांड्य, गाव येथील कदय, व कोकणांतील शिलाहार, राज्यकर्त्यांची मदत घेऊन विक्रमादित्यावर सारी केली; विष्णुवर्धन याने विक्रमादित्याच्या शक्तीचा अगा- ऊच योग्य अंदाज बांधून, विशेष जय्यत तयारी करून आणि इतर तीन राजांची मदत घेऊन ही स्वारी केली होती; त्यामुळे या सर्वांच्या एकत्र झालेल्या सैन्यापुढ एकट्या विक्रमादित्याचा खात्रीने यशवीपणाने निभाव लागे- लच, असा संभव नव्हता; तथापि त्याच्या नेहमीच्या तेजस्वी, व धाडशी स्वभावास अनुसरून त्याने मोठ्या हिमतीने या आपल्या शत्रू बरोबर मोठ्या घाडीने टक्कर दिली; पण शत्रूचे सैन्य संख्येने व बलानें अधिक म्हणजे त्यांच सैन्य प्रतितोलाहून दोन्हीं ही बाबतींत कमी असल्यामुळे या युद्धांत विक्रमा- दित्याचा पूर्णपणे पराजय होऊन त्यास नामशेष होण्याची वेळ आली होती;