Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११९ )

पूर्णपणे वाताहत करून टाकिली; आणि सोमेश्वराचा पाडाव करून त्यास आपला कैदी केलं.
 विक्रमादित्य यांस स्वतः राज्यपदाचा स्वीकार करावा, अशी बिलकुल इच्छा नव्हती; तथापि या वेळीं तो अडचणीच्या परिस्थितीमध्ये गुरफटला गेला; कारण त्याचा वडील भाऊ सोमेश्वर याचा स्वभाव अनुभवाने त्यास पूर्णपणे कळून चुकला होता, व त्याच्यावर पुन्हां मागील सर्व गोष्टी विसरून उपकार केले, आणि त्यास पुन्हां राज्य पदारूढ केलें तरी तो त्याच्या मनातील द्वेषभाव केव्हांही सोडणार नाहीं, अशी त्याची खात्री होती; त्यामुळे त्यास पुन्हा गादी- वर विणे, म्हणजे आपल्या शत्रूस आपणच होऊन बलवान करून स्वतःच्या जीवित्वास व प्रसंग अस्तित्वासही, नेहमी धोक्याच्या व भीतीदायक स्थितींत ठेवणे होय, असें त्यास स्वाभाविकरित्याच वाटत होते; उलटपक्ष आपला धाकटा भाऊ जयसिंह यांस गादीवर स्थापन करावें, तर तो अननुभवी, काहींसा अकर्तृत्ववान, अदूरदर्शी, हलक्या कानाचा, व अनिश्चित मनाचा आहे, ही ही गोष्ट त्यास माहीत होती. त्यामुळे त्याच्या हांतून दक्षिणेचे राज्य सांभाळण्याची मोठी व महत्वाची जबाबदारी यशवीपणे पार पाडविली जाणार नाहीं, व निरनिराळीं संकटे व अडचणी उपस्थित होऊन त्या निस्तारणे ही पुन्हां आपणालाच भाग पडेल असें त्याचें मत होते; त्यामुळे दक्षिण देशाची गादी त्यानें स्वत स्वीकारली व आपणास राज्याभिषेक करून घेतला; ( ३०स. १०७६ ) आणि याच वेळीं आपला धाकटा भाऊ जयसिंह यांस पूर्व कदंब वंशाच्या ठिकाणी बनवासी येथे राज्यपदावर नेमलं त्या नंतर त्याने करहाटक उर्फ कन्हार येथील शिलाहार घराण्यांतील राजाची विशेष लावण्यसंपन्न मुलगी नामें चंद्रलेखा हिच्या बरोबर विवाह केला, व मोठ्या कुशलतेनें दक्षिण देशाचा राज्य- कारभार चालविण्यास सुरवात केली; तथापि राज्यकारभार चालविण्यास आव श्यक असलेल्या शांततेचा काळ त्यास फार दिवस लाभला नाहीं; कारण विक्रमा दित्याने बनवासी येथे राज्यपदारूढ केलेला त्याचा धाकटा भाऊ जयसिंह हा अविचारी व हलक्या कानाचा आहे, ही गोष्ट त्याच्या राज्याच्या आसपास अस- गाय विक्रमादित्याच्या शत्रूच्या कानावर आल्याने त्यांनी विक्रमादित्या विरुद्ध त्याच्या बरोबर कारस्थानें मुरू करून त्याच्या विषयीं जयसिंहांचे मन पूर्णपणें कलुषीत करून टाकिले, व त्यास आपल्या कटांत ओढून घेऊन विक्रमादित्या-