Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११८ )

मुलीचें जयकेशीच्या नातवा बरोबर लय करून दिलें, त्यामुळे तर ते परस्पर निकटचे संबधीही झाले.
 अशा रितीनें विक्रमादित्याच्या पराक्रमाची या प्रांतांत ख्याती झाल्यामुळे. मटबार किनाऱ्यावरील अलूप येथील राज्यकर्त्यानें त्याचे सख्य संपादन केलें, व चोल राज्यकर्त्यानें आपली कन्या विक्रमादित्यास देऊन त्याच्याशी आपले नातें जोडून घेतले; तथापि या विवाहा नंतर चोल राजा लवकरच मृत्यू पावला; व त्या राजसत्ते विरुद्ध एक मोठे बंड उद्भवले. त्यावेळी विक्रमादित्यानें तें मोडून टाकून त्याच्या मुलास म्हणजे आपल्या मेहुण्यास तेथील गादीवर स्थापन केलें ; व तो तुंगभद्रा नदीकडे परत फिरला ही संधी साधून त्याच्या मेहुण्याच्या व त्याच्याही वैरी झालेल्या सरदार मंडळींनी, त्या उभयतांच्या विरुद्ध पुन्हां कारस्थाने सुरू केली, आणि या संधीचा फायदा घेऊन वेंगी देशाचा राज्यकर्ता नामे राजिंग यार्ने चोल देशावर स्वारी करून तो देश पादाक्रांत केला, व . तेथील राजास पुन्ही पदभ्रष्ट करून टाकिलें, तथापि आपल्या या आगळिकी मुळे विक्रमादित्य आपणावर चालून येईल, व त्याच्या बरोबर आपणास टिकाव धरवणार नाहीं, अशी राजिग याची खात्री होती परंतु त्या बरोबरच विक्रमा- दित्याचे, त्याचा वडील भाऊ जो सोमेश्वर, याच्याशी वांकडे आहे, ही गोष्ट ही त्यास माहित होती; म्हणून त्यानें गुप्त रीतीनें अगाऊच सोमेश्वराशीं बोलणें करून, “प्रसंग पडल्यास मी तुला विक्रमादित्या विरुद्ध मदत करीन, " असें त्याच्या कडून अभिवचन मिळविलें होतें. राजीग याच्या अंदाजा प्रमाणे, विक्रमादित्यास त्याच्या मेहुण्याला राजिग याने पदभ्रष्ट केल्याची बातमी समजल्या बरोबर, त्यानें राजिग यांजवर स्वारी केली; तेव्हां राजिग यानें अगाऊ ठरल्याप्रमाणें सोमेश्वरा कडून मदत आगवून त्याच्याशीं युद्ध सुरू केलें. आपला वडील भाऊ सोमेश्वर हा आपल्या शत्रूस मिळून अशा रीतीनें आपणावर चालून येईल, अशी विक्रमादित्यास नुसती कल्पना सुद्धां नव्हती; त्यामुळे अकल्पितरित्या त्यास राजिंग व सोमेश्वर या उभयतांच्या सैन्याच्या जोडगोळी बरोबर टक्कर देणं भाग पडले होते. तथापि तो मोठा धाडशी, हिंमती, व पराक्रमी असल्यानें त्याने या जोड सैन्या बरोबर टक्कर देण्याचे ठरविले; त्या एकत्र झालेल्या सैन्यावर मोठ्या धडाडीने हल्ला करून त्या सैन्यांची