Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११७ )

अपमान आहे, असे नसतेच कांहीतरी त्याच्या मनानें घेतलं, आणि त्याने आपण होऊनच आगळीक करून, विक्रमादित्या सारख्या निरुपद्रवी बलिष्टाश - वैर आरंभिले; ज्या विक्रमादित्याने स्वतःत पूर्णपणे धमक असून स्वतः पराक्रमी शूर व कर्तबगार असून आपण होऊन युवराज पद नाकारिले, व भावी राज्य- पदाचा त्याग केला, आणि अशा रीतीनें आपल्या नालायक वडील भावास तें आपण होऊन अप्रत्यक्षपणे मिळवून दिलें, आपल्या कर्तृत्वाच्या आधाराचा त्यास "टेका दिला, आणि त्याच्या अयोग्य वर्तनास आळा घालणें आपल्या अटोक्या- बाहेर गेलेलं आहे, अशी त्याची खात्री झाल्यावर त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारें न वागता, अथवा त्यास पदभ्रष्ट करणं ही गोष्ट, त्याच्या हातची सहज करिता येण्यासारखी व प्रजेच्या सुखाची व तिजकडून अनुमोदन, आणि पुष्टी मिळण्याच्या खात्रीची असून सुद्धां त्याप्रमाणे कोणताही सक्तीचा मार्ग न स्वीकारितां, जो आपण होऊन राज्य सोडून, आपल्या हिंमतीवर व कर्तृत्व शक्तीच्या खात्रीवर बाहेर पडला त्यास, या आपल्या भावाच्या सैन्याबरोबर युद्ध करणे किती तरी जिवावर आले असेल ? पण तो प्रसंग असा होता कीं, एक तर सोमेश्वराच्या सैन्याबरोबर युद्ध करून त्यास हतवीर्थ करावें, नाहीं तर स्वतः आपण होऊन त्याचे कैदी होऊन पुढील विटंबना भोगण्याकरितां तयार व्हावें; कोणीही कर्तबगार व शूर सेनानायक पहिलाच मार्ग केव्हाही निःसंशय स्वीकारील; आणि विक्रमादित्याने ही तोच मार्ग स्वीकारिला; येऊ नये तो प्रसंग आला, आणि त्यास सादर होणे ही आतां नाइलाजाने प्राप्त झालें, असें पाहि- ल्यावर त्याने सोमेश्वराच्या सैन्याबरोबर मोठ्या आवेशानें, चिकाटीनें व निक- रानें युद्ध केलें, आणि त्यांत त्याच्या सैन्याचा पूर्णपणे पराजय करून त्यांतील पुष्कळसें सैन्य गारद करून टाकले; तथापि सोमेश्वराने एवढी आग- ळीक केली असूनही तो, त्याची खोड मोडण्याकरिता परत फिरला नाहीं, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे; त्या नंतर तो मार्ग क्रमीत उत्तर कानडा प्रांतांतील कदंब वंशाची राजधानी में वनवासी शहर, तेथे थोडे दिवस राहिला, व तेथून पुढें मलय देशाकडे वळला. तेव्हां त्याला गोपकपट्टण अथवा गोवें येथील कदंबवंशीय राज्यकर्ता जयकेशी हा शरण येऊन त्यानें त्याच्याशीं सख्य केले; त्यानंतर कांहीं काळाने विक्रमादित्याने आपल्या मल्लाळ महादेवी या