Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११६ )

 मध्यंतरीं राजा सोमेश्वर उर्फ आहव मल्ल हा तापाने आजारी झाला, वा यांतून आतां आपण जगत नाहीं, असें पाहून शंकराचे स्मरण करीत त्यानें तुंग- भद्रा नदींत जलसमाधी घेतली. (इ. स. १०६९ ) या वेळीं विक्रमादित्य हा वेंगी येथील स्वारीवर असून तिकडून तो यशश्वी होऊन परत येत होता. त्यास रस्त्यांतच आपल्या वडिलाच्या मृत्यूचे वर्तमान समजले तेव्हा तो मोठ्या लग- बगीनें राजधानीत येऊन दाखल झाला: तथापि तो तेथे येऊन दाखल होण्या-- पूर्वीच त्याचा वडील भाऊ व युवराज सोमेश्वर हा "भुवनैकमल" असा किताब धारण करून गादीवर बसला होता. विक्रमादित्य राजधानीत येऊन दाखल झाल्यावर सोमेश्वराने त्याचे योग्य आदरातिथ्य केलं, व थोडे दिवस तो त्याच्या' सलयानें वागून राज्यकारभार चालवित राहिला; परंतु त्याच्यांत कर्तृत्वशक्तीचा पुष्कळच आभाव असून आपल्या प्रजेच्या सुख-समृद्धीची भावनाही त्याच्या ठायीं वसत नव्हती म्हणून गादीवर बसल्या नंतर थोडक्याच दिवसांत त्याने प्रज्ञेवर निरनिराळ्या प्रकारें जुलूम करण्यास सुरवात केली; त्यामुळे सर्व प्रजा हवालदिल झाली व त्या संबंधी सारख्या कागाळ्याही विक्रमादित्याकडे येऊं लागल्या : तेव्हा त्याला " आता काय करावें, " असा विचार उत्पन्न झाला; या बाबतींत सोमेश्वरास दोन उपदेशाच्या विनंतिचे शब्द सांगून त्यास सन्मार्ग गामी करण्याची त्याची इच्छा होती; परंतु तो आपले ऐकणार नाही, उलट आपला अपमान करील, अशी त्यास खात्री होती. म्हणून त्याने सोमेश्वरास तेथील प्रजेस त्यांच्या नशिबाच्या हवाल्यावर सोडून देशत्याग करण्याचा निश्चय केला, व आपला धाकटा भाऊ जयसिंह यास बरोबर वेऊन आपल्या जवळील बन्याच मोठ्या सैन्यासह तो राजधानी सोडून बाहेर पडला; परंतु, ही बातमी सोमेश्वर यांस कळल्यावर त्यास अतीशय राग आला, व त्याचा पाठलाग, करून त्यास व जयसिंह यांस पकडून आणण्या करितां त्याने आपले सैन्य त्याच्या वर रवाना केल: वास्तविक पाहातां विक्रमादित्याने सोनेश्वरास कोणत्याही प्रकारें तिळमात्रही दुखवलं नव्हते व त्याच्याशी मतभेद होण्याचा कोणताही प्रसंग. येऊ नये, या इच्छेनें त्यानें सोमेश्वराचे राज्यही सोडून तो पर ठिकाणी जात होता; तथापि संमिश्वर हा स्वभावाने इतका अनियंत्रित व तारासार विचार- सत्य होता, की ही साधी व सरळ गोष्ट ही त्यास आवडली नाहीं; इतकेच नाहीं तर विक्रमादित्वीकारिलेश मार्ग त्यास उद्दामपणाचा वाटला; हा आपला