Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११५ )

च्या सर्व भानगडी मिटवून टाकिल्या; शिवाय त्याने चोलराजावर दोन तीन स्वाऱ्या करून त्या नंतर चेंदी देशावर ही स्वारी केली त्या वेळीं त्या टिकाण कर्ण या नांवाचा राजा राज्य करीत असून त्रिपुर उर्फ तेवर हैं त्याच्या राजधा- नीचे शहर होते; या स्वारीत त्याने कर्णाचा पराभव केला, व समुद्र कांठच्या प्रदेशावर स्वारी करून तो प्रदेश हीं त्यानें आपल्या हस्तगत करून घेतला; त्या नंतर तो दक्षिणेकडे परत येत असतां त्यास चोल राज्यकत्याने मध्यंतरी अडविले; परंतु सोमेश्वराने त्याचा पराभव करून त्याच्या राजधानींच शहर जे कांची ते हस्तगत करून घेतलं, व त्यास शरण येणें भाग पाडले; त्यानंतर त्याने कनोज येथील राजावर स्वारी केली, व त्याचा पराभव करून त्यास ही आपल्या नियंत्रणाखालीं आणिलें; आहव मल्ल सोमेश्वर यांस सोमेश्वर ( वाकटा ) विक्रमादित्य ( धाकटां ) व जयसिंह असे तीन मुलगे होते; त्यापैकी मधला मुलगा विक्रमादित्य हा विशेष पराक्रमी, व कर्तृत्ववान असल्याने आपल्या मागे त्याने गादीवर यावे, अशी ( पहिल्या ) सोमेश्वराची इच्छा होती, परंतु विक्रमा दित्याने युवराज पद स्वीकारण्याचे नाकारल्याने ते वडील मुलगा सोमेश्वर यांस अखेरीस त्याच्या पित्याने दिले. तथापि कोणतीही महत्वाची जबाबदारीची व पराक्रमाची कामगिरी सोमेश्वर हा युवराजाकडे न देतां विक्रमादित्या कडेसच सोपवीत असे; चोल आणि चालुक्य, या घराण्यति अपठति वैरभाव नांदत असून त्यांमध्ये नेहमीं युद्ध वगैरे भानगडी उपस्थित होत असत; त्याप्रमाणेच या वेळीही ह्या परस्परामध्ये युद्ध सुरू झाले होतें; त्यामुळे सोमेश्वरानें या काम- गिरीवर विक्रमादित्यास पाठविले, व त्याने चोल राजाचा पराभव करून ही कामगिरी यशश्वीपणे बजाविली. याच काळांत मालवाधिपतीस एक तिसराच जबरदस्त प्रतिस्पर्धी उत्पन्न झाला, व त्याने त्यास पदभ्रष्ट करून देशोवडीस लाविले; तेव्हां त्याने आपणास पुन्हां माळवा देशाच्या गादीवर बसविण्या बद्दल विक्रमादित्याची मदत मागितली व ती मिळवून त्याच्या मदतीनें त्यानें आपले गमविलेले राज्य परत मिळविले. या शिवाय या विक्रमादित्याने गोड उर्फ बंगाल, व कामरूप म्हणजे आसाम प्रांतावर व त्या शिवाय केरळ, सिंहल योगी, चक्रकोटरे प्रदेशावरही स्वाया केल्या होत्या, असा उल्लेख आढळतो.