Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११४ )

त्याने माळवा प्रांतावर स्वारी केली, व तेथील राजा मुंज ( प्रसिद्ध भोजराजाचा चुलता ) याचा पराभव केला; या युद्धात तैलपानें मुंजराजास बंदीवान केलें, व पुढे त्याचा शिरच्छेद केला; त्यानंतर लाट अथवा दक्षिण गुजराथ प्रांतही कांही काळाने त्याच्या स्वामित्वा खाली आला. या तेलाने राष्ट्रकूट घरा नामशेष केले होते; तरी त्यानें त्याच घरण्यांतील शेवटचा राजा ककल 'याची कन्या नामें जाकन्या हिचे बरोबर विवाह केला होता; या स्त्री पासून त्यास सत्याश्रय, व दशवर्म, असं दोन मुलगे झाले; त्या पैकीं तैलपाच्या मृत्यूनंतर ( इ. सन ९९७ ) त्याचा वडील मुलगा सत्याश्रय हा गादीवर आला; परंतु तो पुत्रसंतान विरहित वारल्या मुळे ( इ सन १००९ ते इ. १०१६ ) त्याच्या मागून त्याचा धाकटा भाऊ जहसिंह उर्फ जगदेकमल्ल, हा गादीवर आला; हा जयसिंह बराच पराक्रमी असून त्याने माळवा प्रांतांत आपल्या विरुद्ध झालेला एक बलिष्ट कट मोठ्या हिंमतीने चिरडून टाकिला, व चेर व चोल येथील राज्यकर्त्यांवर स्वारी करून त्यांना ही त्याने आपले अंकित केले; मालवा- धिपती परमार वंशी राजा मुंज याचा तेलपाने शिरच्छेद केल्या वेळेपासून या घराण्याचे चालुक्य घराण्याशीं मोठें वैमनस्य उत्पन्न होऊन तें वृद्धिंगत होत गेले होतें व जेव्हा जेव्हां संधी मिळेल, त्यात्या वेळीं चालुक्य सत्ते विरुद्ध माळवा प्रांतांत निरनिराळी कारस्थाने, कट व फंद फितूरी उत्पन्न होत होती; त्यामुळे जयसिंहाने जरी माळवा प्रांतांत त्याच्या विरुद्ध झालेला उपरी निर्दिष्ट एक प्रबळ कट नामशेष करून टाकिला होता, तरी चालुक्य सत्ते विरुद्धची तेथील चळवळ व खटपट किचित् ही शिथिल झाली नव्हती; व आपल्या विरुद्धच्या ह्या चळ- वळी खटपटी मोडून काढण्या करिता गादीवर आलेल्या प्रत्येक चालुक्य राज्य- कार्याला माळवा प्रांतावर स्वारी करावी लागली होती. अशा स्थितीत माळ- व्याच्या गादीवर या वेळीं असलेला प्रसिद्ध राजा भोज यानें राजरोसपणे मुंज राजाच्या ६धाचा चालुक्य घराण्यावर सूड घेण्याचा निश्चय केलाः मध्यंतरी जयसिंह हा ( इ. सन १०४० मध्ये ) मृत्यू पावला, व त्याचा मुलगा सोमेश्वर हा गादीवर आला; तो जयसिंहाच्या मानानें विशेष शुर व कर्तृत्ववान होता; त्यानें गादीवर आल्यावर गुजराथचा राजा भीमदेव याची मदत घेऊन माळवा प्रांतावर स्वारी केली; भोज राजाचा पराभव करून त्याची राजधानी शहर तेही अपल्या हस्तगत करून घेतले; व माळवा प्रांतांतील आपल्या विध