Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १११ )

आरंभिला. चालुक्य घराण्यास संपुष्टांत आणिल्यावर त्यानें कांची, कलिंग, कोसल, श्रीशैल, माल, लाट म्हणजे दक्षिण गुजराथ, व टंक येथील राज्यावर स्वाऱ्या करून तेथील राज्यकर्त्यांना पूर्णपणे पराभूत केले, व त्यांनां भापल्या श्रेष्ट सत्तेच्या आधीन होणे भाग पांडिलें दंतीदुर्ग यांस पुत्रसंतान नव्हते; त्यामुळे त्याचा चुलता व इंद्रराजाचा धाकटा भाऊ कृष्णराज उर्फ शुभतुंग हा त्याच्या मागून गादीवर आला. तो वास्तवीकरित्या दंतिदुर्गा इतका कर्तबगार नव्हता; तथापि दो अगदीच नालायक नसून बराच कर्तव्गार व पराक्रमी होता. याच्या कारकी- दत पलक घराण्याने आपले पूर्व महत्व पुन्हां मिळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु कृष्णाराज यानें त्यांची सर्व चळवळ चिरडून टाकून त्यांनां पूर्णपणे निःसत्व करून टाकिले, मोगलाईत वेरूळ गांवाजवळ कांहीं प्रसिद्ध व प्रेक्षणीय कोरीव लेणी असून त्यांत कैलास या नांवाचे एक तर विशेष प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहे; तें या कृष्ण- -राजानेच दगडांत कोरविलेले असून सर्व जगांत या " कैलास" मंदिराचे काम अतीशय मड, प्रसिद्ध, व प्रेक्षणीय, म्हणून गणले व नावाजले गेलेले आहे. कृष्णराजा नंतर त्याचा मुलगा गोविंद उर्फ गोविंदराज हा गादीवर आला; परंतु तो कर्तुतहीन असल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ प्रभूतवर्ण उर्फ ध्रुव यानें त्याख पदभ्रष्ट केले, व आपण राज्य पदारूढ झाला. प्रभातपूर्णाच्या मानाने हा पुरुक- ळच कर्तृत्ववान, शहाणा, व पराक्रमी, होता; त्याने पालव वंशीय राजास जिंकून - त्याजपासून खंडणी मिळविली, चेर देशाच्या राज्यकर्त्यांस जिंकून त्यास बंदीवान करून आणिलें, आणि प्रयाग जवळील कौशांची येथील राजा वत्स यांस जिंकून त्याची राजही त्याने हिरावून आणिली. प्रभात पूर्णाच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा गोविंद हा गादीवर आला; हा तिसर। गोविंद या नांवानें प्रसिद्ध असून • राष्ट्रकूट घराण्यांतील हा सर्वात अधिक पराक्रमी राजा अशी त्यांची ख्याती आहे. युवराज असल्या वेळेपासूनच हा पुढे अत्यंत पराक्रमी राज्यकर्ता होईल, असे त्याच्या शोर्य, साहसादि गुणांवरून पूर्णपणे निदर्शनात आले होते; तो -गादीवर आला न आला तोच त्याच्या आसपासच्या बारा राजांनी त्याच्या विरुद्ध एक भयंकर जूट निर्माण केली होती; परंतु त्यानें त्या सर्वांचा पूर्णपणे पराजय करून तो जूट पार धुळीस मिळविली. त्याच्या राजधानीचे शहर नाशिक- जिल्ह्यांतील मयूरखडी है अनून त मोरखंड. या नावाचा जो एक डोंगरी किल्ला आहे त्याच्या आसपास असावें असा अंदाज आहे. त्याने गुजराथ व माळवा