Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११० )

घराण्याशी युद्ध प्रसंग करावे लागले होते, व त्या घराण्यास पराभुत करूनच चालुक्य घराण्याने त्या देशांत आपली गादी स्थापन केली होती; तथापि योग्य संधी मिळतांच राष्ट्रकूट घराण्याने चालुक्य घराण्यास नामशेष करून त्या ठिकाणीं पुन्हा आपली गादी स्थापन केली होती. दंतीदुर्ग याच्या बापाचे नांव इंद्रराज असे असून त्याची आई चालुक्य कुळांतील होती; दंतिदुर्ग हा मोठा शूर असून चालुक्य घराण्याच्या राजसत्तेवर घाव घालण्यापूर्वी त्याने अनेक पराक्रम करून आपले सामर्थ्य वाढवीत नेलें होतें; चालुक्य घराण्याच्या कारकीर्दीत केरल, पांड्य, चोल, कांची वगैरे ठिकाणचे राज्यकर्ते चालुक्याच्या सत्तेस नेहमीं निर- निराळ्या प्रकारे त्रास देत असत; त्या मुळे त्यांचा प्रतिकार करण्याकरितां, व त्याच्यावर दडपण ठेवण्याकरिता कर्नाटक प्रांताच्या सरहद्दीवर चालुक्यांची मोठी फौज ठेविलेली असे, आणि हीच राज्याची मुख्य फौज हाणून ही असे; इतकेच नव्हे तर या सैन्याच्या अस्तित्वावरच चालुक्यांची तिकडील सत्ता, व त्यांच्या राज्याचे सामर्थ्य ह्रीं बहुतेक टिकलेली होती; या गोष्टीचा दंतिदुर्गानें मोठ्या धूर्तग्णाने बरोबर अंदाज बांधून त्या सैन्यावर मोठ्या निकराने हल्ला केला, व तँ पूर्णपणे पराभूत करून टाकिलें; त्यामुळे स्वाभाविकरित्याच चालुक्य सत्ता हतबल झाली; तिच्या मुळांवर घाव घालून ती पार नामशेष कर- ण्यास त्यास एकप्रकारें उत्तेजन व साधन मिळाल्या सारखेच होऊन गेले; व थोड्याशा सायासविच यशःप्राती मिळवून तो इ. सन ७५३ च्या सुमारास महाराष्ट्र देशाचा अधिपती बनला.
 या राष्ट्रकूट राज्यकर्त्यांच्या राजधानीचे शहर मान्यखेट म्हणजे निझा: माच्या राज्यांतील मालखेड उर्फ मलखेड हे असून प्रसिद्ध व विद्वान राज्य- कर्त्यांची परंपरा ह्या दृष्टीनें तें शहर नावाजलेलें होतें. कारण "विजय धवल या ग्रंथाचा कर्ता वीर सेनाचार्य " उत्तर पुराण " ग्रंथाचा कर्ता गुण भद्राचार्य "व" महा पुराण " चा कर्ता जिन सेनाचार्य वगैरे प्रसिद्ध राजे याच ठिकाणी निर्माण होऊन गेले होते. दंतिदुर्ग हा अतिशय पराक्रमी असून विशेष महत्वा- कांक्षी ही होता; त्यामुळे चालुक्य घराण्याची राजसत्ता आपल्या हाती मिळवूनच तो स्वस्थ बसला नाहीं, य तेवढयावरच त्यांचे समाधान झाले नाही; त्यानें दिवसे दिवस आपले सामर्थ्य व सत्ता वाढवीत नेण्याचा मोठ्या जोराने प्रयत्न