Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११२ )

या प्रांतावर स्वारी करून तेथील राजांना शरण येणे भाग पाडले, विव्य प्रांतां- तील राजा आपण होऊनच त्याच्या सत्तेच्या आधीन झाला; त्यामुळे त्यानें दक्षिण दिशेकडे आपला मोर्चा फिरविला व पल्लव आणि वेंगी येथील राजांना त्यानें आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले; अशा रोतीनें नर्मदा आणि तुंगभद्रा, या दोन नद्यांमधील खुद्द त्याच्या स्वतःच्या ताब्यात असलेल्या प्रदेशा शिवाय, उत्तरेस माळवा प्रांतापासून तो दक्षिणेस कांची वगैरे पर्यंतचा सर्व प्रदेश, त्याच्या सार्वभौम सत्तेखाली आला त्यापैकी लाट प्रांतावर म्हणजे गुजराथ प्रांताच्या दक्षिण भागावर त्यानें आपला धाकटा भाऊ इंद्रराज यांस राजा बनविलें होतें; गोविंदाच्या मागून त्याचा मुलगा अमोघवर्ष हा गादीवर झाला; (इ०सन८१४ ते ३०८७७) हा मोठा शूर व पराक्रमी असून त्यास " राज- राज " व " वीर नारायण" असे दोन किताब होते. त्यानें म्हैसूरचे गंग घराणे व कांची अथवा कांचीपूरचे पलव घराणे, त्या प्रमाणेच अगदी दक्षिणेकडील चोल, व पांड्य, हीं घराणी, आपल्या अंकित केलीं होतों; शिवाय उत्तर कोंकण प्रांतांतील शिलाहार राजे पुलिकेशी व त्याचा मुलगा कपर्दी, यांनीही त्याची श्रेष्ट सत्ता मान्य केली होती. कान्हेरी येथील कोरिव लेण्यांत अमोघवीचे नांव दिलेलें आहे; त्यावरून तीं त्याच्या कारकीर्दीत खोदविली गेली असावी, असा अंदाज आहे; अमोघवर्षाची जैनधर्माच्या दिगंबर पंथावर भक्ति होती; प्रसिद्ध "आदिपुराण" या ग्रंथाचा कर्ता जीनसेन हा त्याचा गुरू होता; त्यास गुणभद्र या नावाचा एक मुलगा होता; त्यानं या ग्रंथाचा उत्तर भाग लिहिला असून तो "" उत्तर पुराण "" या नांवाने प्रसिद्ध आहे. अमोघ वर्षाची कारकीर्द फार मोठी म्हणजे बासष्ट त्रेसष्ट वर्षांची असून त्याने इ० सन ८१४ ते इ०सन ८७७ पर्यंत राज्य केलें, अमोघवर्षानंनर त्याचा मुलगा अकालवर्ष हा गादीवर आला; त्यानें हैहय कुळांतील चेरी देशाच्या राज्यकर्त्याच्या मुलीशीं विवाह केला होता, या स्त्री पासून त्यास चगत्तुंग या नांवाचा एक मुलगा झालेला होता. परंतु अकाल वर्षाच्या मागें तो गादीवर न येतां त्याचा मुलगा इंद्रराज हा गादीवर आला. ( इ० सन ९१२ ते इ. स. ९१६) या इंद्रराजानें ही हैहय वंशांतील विजया अथवा विजयात्रा या नांवाच्या राजकन्येशी विवाह केला होता; तिच्या पासून त्याला अमोघवर्ष, व गोविंद, असे दोन मुलगे झाले होते, इंद्रराजाच्या मागून अमोघ वर्ष हा गादीवर आला, (इ०सन ९१६ ) परंतु त्याचा धाकटा भाऊ