Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०९ )

गुजराथेंत " सोळंखी वंश" असे म्हणत; याच कुळात मूळराज सोळंखी या नावाचा एक अतीशय पराक्रमी राज्यकर्ता निर्माण झाला; त्याची गादी अन- हिलपट्टण उर्फ पाटण येथे होती. विक्रमादित्य मृत्यू पावल्यावर ( इ. सन ६८० ) त्याचा मुलगा विनयादित्य हा दक्षिण देशाच्या गादीवर आला; ( इ. सन ६८० ते इ. सन ६९६ ) हाही आपल्या वडिलाप्रमाणेच शूर व कर्तृत्ववान असून त्यानें केरल, पांडय, चोल, कळंत्र, हैहय, मालव, वगैरे राजांना आपल्या योग्य नियंत्रणाखालीं ठेवून आपल्या पक्षाकडे पूर्णपण भोटून घेतलें होतें. त्याप्रमाणेच कावेर, सिंहल वगैरे ठिकाणच्या राज्यकर्त्यांना त्याने आपले खंडणी देणारे मांडलीक करून ठेविले होते; विनयादित्याच्या मागून त्याचा मुलगा विजयादित्य ( इ. सन ६९७ ते इ. सन ७३२ ) व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा विक्रमादित्य ( इ. सन ७३३ ते इ. सन ७४७ ) हे अनुक्रम गादीवर आले; दुसऱ्या विक्रमादित्याच्या कारकीर्दीत पल्लव घराण्याने त्याच्या सत्तेविरुद्ध पुन्हां उचल घेतली; त्यामुळे पलव राज्यकर्ता दति पोतवर्मा याजबरोबर तुडाक प्रांतांत त्यास मोठे निकराचे युद्ध करावें लागले; या युद्धांत दंतिपोतवर्भा याचा पूर्णपणे पराजय होऊन त्यास जिवाच्या भयानें समरभूमी सोडून पळून जाणे भाग पडले; व विक्रमादित्यास त्यामुळें पुष्कळच निरनिराळी मौल्यवान लूट मिळाली; त्या नंतर त्यास कांची येथील राजा बरोबर ही युद्ध करावे लागले; त्या युद्धांतही विक्रप्तादित्याने त्याचा पुर्णपण पराजय करून त्यास हतवीर्य केलें; दुसऱ्या विक्रमादित्या नंतर त्याचा मुलगा कीर्तिवर्य अथवा कीर्तिवर्या हा इ० सन ७४७ मध्ये गादीवर आला; हादी मोठा शूर असून त्यासही पल्लव राज्यकर्ता नंदिपोतवर्मा याच्या बरोबर, त्याच्या-- वर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याकरीतां, पुष्कळ दिवस मोठया चिकटीनें झगडत रहावे लागले, आणि किर्तीवर्म्याने अखेरीस त्याचा पूर्ण पराजय करून त्याचे राज्यही आपल्या हस्तगत करून घेतले; परंतु या युद्धांमुळे त्याचे स्वतःच राज्यही भतीशय बरहींन झालें; त्यामुळे दंतिदुर्ग या नांवाच्या राष्ट्रकूट वंशांतीय एका मांडलीक राजानें कीर्तिम्याशी झगडून त्याचे राज्य हिरावून घेतले व महाराष्ट्रांत आपल्या राष्ट्रकूट घराण्याची गादी स्थापन केली. ( इ०. सन ७५३.)
 महाराष्ट्रांत आपली सत्ता स्थापन करितांना चालुक्य घराण्यास राष्ट्रकूट