Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०८ )

"एकच्या गुहेतील चित्रांत मोठ्या उत्कृष्ट रीतीनें दाखविलेला आहे; आणि ऐति- हासिक दृष्टया हैं चित्र अत्यंत माननीय असून शिवाय निरनिराळया भनेक गोष्टींचा निर्णय करण्यासही तें अत्यंत उपयुक्त व महत्वाचे आहे.
 पुलिकेशी यानें आपला धाकटा भाऊ विष्णुवर्धन यांस आपल्या राज्याच्या पूर्वेकडील भागाचा कारभार सोपविला होता; तथापि त्यापूर्वी त्यास व त्याहून धाकटा बंधू जयसिंह यांस, व विक्रमादित्याचे दोन बंधू, चंद्रादित्य व आदिवर्मा यास, त्यानें अनुक्रमे सातारा, पढरपूर, नाशिक, सावंतवाडी, व कृष्णा व तुंगभद्रा, ह्यां नद्यामधील प्रांत, या विभागांवर राज्यकारभार पाहण्या- करितो आपल्या तर्फे प्रतिनिधी म्हणून नेमिलें होतें. पुलीकेशीच्या मृत्यूनंतर - त्याचा दुसरा मुलगा विक्रमादित्य हा गादीवर बसला; याच्या कारकीर्दीत कांची, चोल, केरल, पांडय, येथील राज्यकर्त्यांनीं चालुक्य सत्तेपासून स्वतंत्र होण्या करितां चंड उभारिलें; परंतु विक्रमादित्यानें तें दोबून टाकून त्यांना पुन्हां आपल्या सत्तेच्या अंकित राहणे भाग पाडले; याच विक्रमादित्याच्या कारकीर्दीत प्राचीन काळच्या लाट या देशांत, म्हणजे दक्षिण गुजराथ मध्ये चालुक्य वंशाच्या एका शाखेनें आपलें राज्य स्थापन केले; या वंशास


जळगांवा शिवाय दुसन्याही मार्गानें आतां या लेण्यास जाण्याची सोय झाली आहे; जी. आ. पी. रेलवेच्या पाचोरा स्टेशन पासून नुकतीच "पाचोरा-जामनेर "रेलवे, " सुरू झाली आहे; त्या रस्तावर पहूर या नांवाचें एक रेल्वे स्टेशन असुन, तेथून ही लेणी सडकेनें अजमार्से तेरा भैलावर आहेत; तेथें जाण्यास . जळगांव व पहूर येथून तांगा, अथवा बैलगाडी भाड्याने मिळते, या लेण्यांतील चित्र मोठी प्रेक्षणीय असून, आसपासचा देखावाही विशेष मनोहर आहे; मेजर जिल याने मद्रास सरकाच्या हुकुमानें व खर्चाने या लेण्यांतील ह्या प्रेक्षणीय चित्रांच्या नकला केल्या, व नंतर त्या लंडन येथें “ क्रिस्टल " राजवाड्यांत ठेव- -ण्यांत आल्या होत्या; परंतु त्या राजवाड्याच्या दक्षिण भागास आग लागून सत त्या जळून गेल्या, त्यानंतर मुंबई येथील "स्कूल ऑफ आर्ट " ( कला शिक्षण- शाळा ] मधील मंडळीच्या मदतीनें मि० जान ग्रिफिथ्स याने त्या पुन्हा तयार केल्या असून त्या हल्ली लंडन येथील साऊथ - केनसिग्टन मधील इडियन म्यूझिम हिंद-वस्तु संग्रहालय - मध्ये ठेविलेल्या आहेत.