Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०४ )

ठिकाण त्यान आपल्या हस्तगत करून घेतले होते; तसेच तो मोटा धार्मिक प्रवृत्तीचा असून त्यानें बदामी येथे श्री विष्णूचे मंदिर दगडांत कोरून त्या मंदिराची पूजाअर्चा व नैवेद्य वगैरेच्या व्यवस्थे करिता स्वतंत्र गांव नेमून दिली होती; सारांश “राज्यकर्ता" या दृष्टीनें मंगलीश हा पुष्कळच कर्तृत्ववान होता; व त्याची अजमासे एकूणीस वर्षांची कारकीर्दही बरीच वाखाणण्या सारखी होती; परंतु तो अतीशय स्वार्थी व आपमतलबी होता; त्यामुळे अनायासें हातीं आलेले राज्य कीर्तिवर्मा याच्या वडील मुलांस-म्हणजे कायदेशीर हक्क- दारास न देतां, व न मिळू देतां, आपल्या मागें आपल्या मुलाकडे व त्याच्या घराण्याकडे तें चालावे अशी त्याची इच्छा होती व त्या प्रमाणे, त्याने बरीच धडपड केली होती; परंतु कीर्तिवर्म्याचा वडील मुलगा दुसरा पुलिकेशी यानें त्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाहिला, व या भानगडींत मंगलीश मारला जाऊन पुलिकेशी हा राज्यपदारूढ झाला. ( कारकीर्द इ० सन ६११ पासून इ. सन ६४२ पर्यंत ) हा मोठा शूर व बुद्धिमान राजा असून त्यानें "सत्याश्वय श्री पृथ्विल्लभ महाराज " असा किताब धारण केला होता; त्यानें राष्ट्रकूट राजा गोविंद याचा पराभव केला, आणि मौर्य, लाट, पाल, व गुर्जर, राज्यकर्त्यां- वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले, व कदंब राज्यकर्त्यास जिंकून त्यांच्या राजधानीचे शहर बनवासी हैं आपत्या ताब्यांत घेतलें. त्याप्रमाणेच पश्चिम समुद्रावरील पुरी या नांवाच्या शहरावर आपल्या शेकडों जहाजांच्या आरमारास सद्द हल्ला करून तें शहर ही त्यानें आपल्या हस्तगत करून घेतले; या वेळों कनोज येथें, प्रसिद्ध बाणकवीचा आश्रयदाता, हर्षवर्धन शिलादित्य हा राज्य करीत असून (इ० सन ६०६ ते इ० सन ६४८ ) तो उत्तरेकडील सर्व प्रदेशाचा सार्वभौम राजा झालेला होता; या हर्षवर्धनच्या मनात नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रांतांत आपली सत्ता स्थापन करावी, अशी इच्छा उत्पन्न होऊन त्याने दक्षिणे- वर स्वारी केली; परंतु पुलिकेशीनें त्याचा पराभव करून त्यास मार्गे परतवून लाविलें व पुढे अशाच प्रकारें अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यानें आपल्या राज्याच्या उत्तर सरहद्दीच्या बंदोबस्ताकरितां नर्मदा नदीवर एक मोठं जोरदार सैन्य ठेवून दिले; आणि या विजयाबद्दल " परमेश्वर" हे नामाभिधान धारण केले; हा मोठा पराक्रमी व विजयी योद्धा असून, उत्तरेस विंध्य पर्वतापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत, व पूर्व पश्चिम समुद्रापर्यंत, त्यानें आपल्या राज्याचा