Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०३ )

दैवत कार्तिकेय हे असून त्यांच्या निशाणावर वराहाचे चिन्ह असे ते आपणास सूर्यवंशीं रजपूत म्हणवीत असत; याच घराण्याची एक शाखा जयशिंहाच्या धुरि- गत्वा खाली दक्षिणत येऊन तिने आपले राज्य स्थापन केलें, व आजूबाजूचा प्रदेश हस्तगत करून घेऊन त्याचा विस्तार केला.
 जयसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजसिंह हा गांदीवर आला; त्यास रणराग व विष्णुवर्धन अशीं दुसरीं दोन नांवें होतीं. हा मोठा पराक्रमी असून त्यानें कदंब, गंग, वगैरे राजांचा पराभव करून आपली सत्ता नर्मदा नदीपासून थेट रामेश्वरापर्यंत स्थापन केली होती; व पालववंशीय राजकन्येबरोबर विवाह करून त्यांना आपल्या पक्षाचे करून घेतले होते, असा उल्लेख आढळतो.
 तथापि दक्षिण प्रांतात माहीत असलेला चालुक्य वंशांतील अत्यंत परा- क्रमी व प्रसिद्ध असा राज्यकर्ता म्हणजे जयसिंहाचा मुलगा पुलीकेशी - पहिला पुलिकेशी - हा होय. या पुलिकेशीनेही पूर्व कालांतील भारतीय राज्यकर्त्याप्रमाणें अश्वमेध यज्ञ केला; व विजापूर जिल्ह्यांतील वातापिपूर उर्फ बदामी ही नगरीं आपली राजधानी केली. याचे पूर्ण नांव “सत्याश्रय श्री पुलिकेशीं वल्लभ महा- राज" हे आहे. याने दक्षिणेतील कलचुरी व राष्ट्रकूट या घराण्यांची सत्ता नाहींशी करून तेथे आपला अंमल बसविला; व कदंब घराण्याचे राज्य जिंकून पल्लवांच्या राज्याचाही बराच प्रदेश त्यानें आपल्या हस्तगत करून घेतला. पुलिकेशी नंतर ( इ० सन ५६७ - ५९१ ) त्याचा मुलगा किर्तिवर्मा हा गादीवर आला; तोही आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी असून त्याने नळ व उत्तर कानडा प्रांतांतील वनवासी येथील कदंब राज्यकर्त्यानां जिंकिलें, व उत्तर कोंकण प्रदेशावरील मौर्य राजास आपल्या सत्तेखालीं आणिलें कीर्तिवर्मा याला दुसरा पुलिकेशी, या सर्वांत वडील मुलासह एकंदर तीन मुलगे होते; परंतु तो मृत्यु पावला त्यावेळी ते अज्ञान स्थितीत होते; म्हणून कीर्तिवर्म्याचा धाकटा भाऊ मंगलीशहा हा गादीवर आला ( कारकीर्द इ० सन ५९१ वे इ० सन- ६१० पर्यंत) हाही राज्यकर्ता कर्तृत्ववान असून त्यानें जबलपूर नजीकच्या वेदी देशाच्या कलचुरी राजाचा पराभव केला; त्यांच्या राजधानीचे शहर जबलपूरा जवळ त्रिपूर उर्फ तेवूर दें होतें; त्याप्रमाणेच पूर्व व पश्चिम किनाऱ्या- पर्यंतचा सर्व प्रदेश व वेंगुर्ल्याजवळील रेडी उर्फ रेवतीद्वीप या नांवाचे