Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०५ ) विस्तार केला होता. तथापि उत्तरेस माळवा, व चेदी, म्हणजे वन्हाड व मध्य प्रांत, या प्रदेशांतील राज्यकर्ते व दक्षिणेकडील पल्लव, पांड्य व चोल देशीय राज्यकर्ते यांच्याबरोबर पुलिकेशी यांस सतत युद्धकलह करावे लागत असत; - त्यामुळे त्यांच्यावर दडपण ठेवण्याकरितां त्याने आपल्या राज्याचे दोन भाग करून पश्चिमेकडील भागाचा कारभार आपणाकडेत ठेविला, व पूर्वेकडील भागाची सर्व राज्यसत्ता व व्यवस्था त्याने आपला कनिष्ट बंधु विष्णुवर्धन " यांजकडे सोपविली; या काळांत म्हैसूरच्या आसपासच्या "चेर " या नावाच्या प्रदेशावर गंग या नांवाचे घराणे राज्य करीत होते; या उभयतां व कोसल आणि कलिंग येथील राज्यकर्त्यांनीं पुलिकेशीचे वर्चस्व मान्य केले होते; त्याप्रमाणेच त्यानें उत्तर कोंकणांतील शिलाहार राज्यकर्त्यांच्या राजधानीचे शहर पुरी हैं ( वर लिहिल्यानमाणे ) युद्ध करून आपल्या हस्तगत करून घेतलें होतें; त्यानें कांचीपूर, उर्फ कांजवेरेम ( कांजी वरम् ) येथील राज्यकर्त्यास शह दिला, व त्यानंतर कावेरीनदी पलीकडील चोल, पांड्य, व केरळ येथील राजांवर स्वान्या करून त्यांना आपल्या श्रेष्ट सत्तेखालीं आणिलें;
 प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएन्त्संग हा इ. सन ६३९ या वर्षी महाराष्ट्रांत आला होता; त्यावेळीं त्यानें त्या देशाची परिस्थिती पाहून व तेथील राज्यकर्ता पुलिकेशी यात्री भेट घेऊन त्यासंबंधी आपल्या प्रवास वृत्तांमध्ये जे वर्णन केल आहे, ते मोठे मनोरंजक, व मनन करण्यासारखे आहे; महाराष्ट्र देशाला त्यानें आपल्या ग्रंथांत " मोहोलाक्ख देश" असें नांव दिले आहे; या देशांतील तत्कालीन स्थिती संबंधानें लिहिताना तो म्हणतो:--
 "या देशाचा राज्यकर्ता त्सतली म्हणजे क्षत्रीय जाती पैकीं असून त्याचें नांव पुलकिशे हें आहे. त्याचे विचार प्रगल्भ व गंभीर आहेत; त्यास इत- रांच्या सुखदुःखाविषयीं विशेष कळकळ वाटत असून तो अतीशय परोपकारी आहे; त्याचे प्रजानन पूर्ण स्त्रार्पण - पुरःसर भक्तीनें त्याची आज्ञा पाळितात. हल्ली कनोज येथील राजा दुसरा शिलादित्य महाराज यानें पूर्व दिशेपासून पश्चिम दिशेपर्यंतची राज्ये जिंकून आपल्या हस्तगत करून घेतलीं आहेत, आणि दूर• दूरच्या राज्यांवर त्याने आपला शह बसविला आहे; परंतु एकटे महाराष्ट्र देशां- -तील लोकच कायते आज तागायत त्याच्या सत्तेच्या आधीन झाले नाहींत; या लोकांना शासन करावे, व त्यांना आपल्या सत्तेखाली आणावें, म्हणून त्यानें