Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०२ )

इ० सन १२२४ मध्ये सुलतान अल्तमश यानें नासिरउद्दीनवर सैन्य पाठवून त्याचा पराभव केला; व नासिरउद्दीन सिंघूनदांत बुडून मृत्यु पावला. त्यानंतर अजमाते दहा वर्षे या प्रदेशांवर सुलतानाचा ताबा राहिला; आणि इ० सन १३३६ मध्ये सुमेर वंशांतील अफ्रा या नांवाच्या शूर पुरुषाने दिल्लीपतीचा त्या प्रांतावरील अंमल झुगारून देऊन आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले; या हिंदु घराण्यानें इ०सन १३८० पर्यंत राज्य केले; त्यांतील शेवटचा हिंदूराजा तिमाजी दा असून त्याच्या मृत्यूनंतर नादीवर आळेल्या पुढील रजपूत राजार्ने मुसलमानी धर्म स्वीकारिला या राजांना "जाम" हीं संज्ञा असे व ते पुढें मुसलमान झाल्यावर ही तीच संज्ञा त्यांच्या नावामार्गे चालू असे; तिमाजीच्या मागून गादीवर आ- भालेत्या व मुसलमानी धर्म स्वीकारिलेल्या या राजाचे नांव सलातीन हें होतें; त्यांच्या मृत्यूनंतर ( इ. सन १३९१ पासून इ० सन १५२० पर्यंत ) अनेक राजे गादीवर आले; त्यांतील शेवटला राजा फिरोज हा असून मुलतानचा राज्यकर्ता शहावेग अर्जून याने त्याच्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला, व सिंधप्रांत आपल्या राज्यांत सामील केला. अशा रीतीनें इ०सन १५२० मध्ये सुमेर मुसल मान घराणे नष्ट होऊन मुलतानच्या राज्याच्या ताब्यात गेलें; पुढे इ. सन १५९२ मध्ये अकबराच्या सैन्याने मिर्झा जानीवेग याचा पराभव करून सिंधप्रांत मोंगली राज्यास जोडिला.
 प्राचीन काळीं नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत जीं अनेक राज- घराणी होऊन गेलीं, त्यामध्ये चालुक्य उर्फ साळुंके, राष्ट्रकूट उर्फ राष्ट्रकुंड, पल्लव उर्फ पालव, कदंब उर्फ कदम व शिलाहार उर्फ शेलार हींच प्रामुख्याने आहेत. महाराष्ट्रांत, म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशांत, चालुक्य घराण्याचा अंमल प्रस्थापित होण्यापूर्वी तेथे पालव वंशीय राज्यकर्त्याचा अंमल चालू होता; या पालव वंशांतील राजा त्रिलोचन याच्या कारकीर्दीत चालुक्य वंशांतील राज्य- कर्ता जयसिंह उर्फ विक्रमादित्य यानें आपल्या मोठ्या सैन्यासह दक्षिण देशावर स्वारी केली, व राष्ट्रकूट वंशांतील राजा कृष्ण याचा पराभव करून इ०सन ५५० च्या सुमारास दक्षिणेत आपल्या चालुक्य घराण्याची गादी स्थापन केली; हॅ घराणे मूळ आयोध्येस राज्य करीत असून त्यांचे हारित व मानव्य असे दोन वोद्धे होते, व त्यांच्या पासून या घराण्याची उत्पत्ती झाली होती; त्यांचे कुल-