Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०१ )

 महंमद कासीम यानें सिंध प्रांतांत, खंडणी उकळणे, हिंदूच्या देवालयांच्या - बाबतीत अतिक्रमण करणें, निरापराधी लोकांची कत्तल उडविणे, लोकांस सक्तीनें धर्मांतर करण्यास भाग पाडणे, पुरातन बांधकामांचा विध्वस उडविणे, व त्यांचे - सामान व तयार साहित्य आपल्या नवीन इमारतींत उपयोगांत भाणणे, वगैरे :- जे अनेक अनन्वित प्रकार केले, त्याचे परिणाम त्यास व त्याच्या ज्ञातिबांधवास लवकरच भोगावे लागले; कासीमच्या या कृत्यांचा प्रतिकार त्यावेळी दाहीर राजास त्याच्या मुलास, राणीस, अथवा प्रजेस, करिता आला नाहीं; पण त्या नंतर त्याच्या वडील मुलोनें आपले पातिवृत्य जतन करून मोठ्या युक्तीनें त्याचा नाश केला. दाहीर राजास दोन मुली होत्या. व कासीम यानें त्यांनां बंदीवान करून खलीफा वलीद यांजकडे बगदाद येथे पाठविलें होतें. तेथे गेल्या- 'वर लवकरच खलीफाची त्याच्या वडील मुलीवर मर्जी बसली; परंतु आपण पवित्र राहून प्रसंग देह त्यागही करावा अशी तिची इच्छा होती; म्हणून तिनें कासीम याचा ही सूड उगविला जावा, व आपली ही इहलोकांतील भावी कष्टप्रद होऊं पाहणारी जीवन यात्रा पूर्ण व्हावी, अशी युक्ती योजिली, व तिर्ने "मजवर कासीमने बलात्कार केल्यामुळे मी भ्रष्ट झाले आहे" असे खोटेंच खलि फास सांगितलें; त्यावरून त्यास कासीमचा अत्यंत राग येऊन कोणत्याही प्रकारें तपास न करितां अविचारानें त्यानें कासीम यांस ठार मारण्याचा हुकूम ' केला, व त्याचा वध करवून त्याचे प्रेत आपणा समोर आणवून दाहीर राजाच्या वडील मुलीस दाखविले; तेव्हां तिला मोठा आनंद झाला, आणि ती खलिफा 'वलीद यांजकडे वळून त्यास म्हणाली, " माझ्या बापाचा व सर्वस्वाचा घात - करणा-या या दुष्ट कासीमाचा पूर्ण सूड घ्यावा एवढ्याच इच्छेने मी त्याच्यावर असा खोटा दोषारोप केला होता; परंतु वास्तवीकरित्या मला त्याने भ्रष्ट केलेले - नसून मी अगद पवित्र आहे. " या मुलीचें हें भाषण ऐकून तिच्या ह्या वर्तना- बद्दल खलीफास अतीशय राग आला, आणि त्याने तात्काळ तिचाही वध केला ! महंमद कसीमच्या या स्वारी नंतर मुसलमान लोकांच्या असा धार्मिक जुलुमा ..मुळें, तीस वर्षांच्या आतच सिंध प्रांताच्या दक्षिण भागावरील मुसलमनी अंमल नष्ट झाला; व सुमेर या नांवाच्या रजपूत घराण्यानें त्या ठिकाणीं आपलें राज्य- स्थापन केले; तथापि सिंधचा उत्तर भाग महमद घोरी यार्ने जिंकून तो सुलतान कुबुद्दीन याचा जांवई नासिरउद्दीन कुबा याच्या तात्र्यांत दिला होता; पुढे