Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०० )

मिळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो निष्फळ करून त्यास चंद्रगुप्तानें. माघार घेण्यास भाग पाडिलें होतें. ( इ. सनापूर्वी ३११ ) पुढे ठाणेश्वरचा' : राजा प्रभाकरवर्धन याचा धाकटा मुलगा व प्रसिद्ध राज्यकर्ता हर्ष याच्या कार- कीर्दीत सिंध प्रांतांत सिंहरसराई या नांवाचा एक शुद्र राजा राज्य करीत होता; परंतु तो आळशी, अनीतिमान व व्यसनी होता; याच्या कारकीर्दीत इ. स. ६४६ मध्यें अरब लोकांनीं सिंध प्रांतावर स्वारी केली, व सिंहरसराई याचा पराभव करून त्यास व त्याचा मुलगा नामें साहसी यांस ठार मारिलें; त्यानंतर सिंध राज्य त्याचा ब्राम्हण प्रधान चच याजकडे गेलें; त्यानें अजमार्से चाळीस वर्षे. राज्य करून तो इ. सन ६८६ या वर्षी मृत्यू पावला, व त्याचा मुलगा दाहीर हा गादीवर आला. याच्या राजधानीचे शहर आरोड हैं असून तें बकर उर्फ भकरच्या किल्ल्याच्या पायथ्यार्शी होतें. यावेळीं बगदाद येथील अरबी खिलापती वर वलीद या नांवाचा एक खलीफा होता. या काळात सिंध देशांतील देवल बंदरों एक हजार मुसलमान तद्देशियांनी पकडून ठेविले; तेव्हां ते लोक सोडून द्यावे, अशी खलीफा वलीद यानें दाहीर जवळ मागणी केली; परंतु हे बंदर त्याच्या ताब्याखालील नसल्यामुळे त्यास ती मान्य करितां आली नाहीं. तथापि त्याचे म्हणणे न ऐकतां खलीफानें महंमद कासीम या नांवाच्या एका शूर व तरुण सरदाराच्या हातांखाली सैन्य देऊन त्यास आपल्या लोकांना सोडवून आण-ण्यास, व दाहीर राजाचे परिपत्य करण्यास, हिंदुस्थानांत पाठविले; त्याप्रमाणे तो हिंदुस्थानांत आल्यावर पहिल्याने देवल येथे गेला, देवल बंदर काबीज करून आपल्या लोकांची सुटका केली; तेथील देवालय हस्तगत करून घेऊन सर्व ब्राम्हणास कैदी केले, व त्यांनी मुसलमान होण्याचे नाकबूल केल्यावरून सतरा वर्षांवरील सर्व ब्राम्हणांची कत्तल करून, व बाकीच्यांना गुलाम करून, स्वदेशीं पाटलिं. त्यानंतर कासीमने दाहीर राजावर स्वारी करून त्याचा पराभव केला; या युद्धात दाहीर मारला गेला, व त्याचा मुलगा जीवाच्या भीतीनें पळून गेला; तथापि त्याच्या रणीने कांहीं काळ मोठ्या शौर्यानें त्याचा प्रतिकार कर- ण्याचा प्रयत्न केला; परंतु अखेरीस तिचा नाइलाज होऊन तिला माघार वेर्णे भाग पडले, व सिंध प्रांत कासीमच्या ताब्यांत गेला; तेव्हां त्यानें दाहीच्या प्रधानास खलिफा तर्फे तेथील प्रतिनिधी नेमिले व आरण स्वदेशास परत गेला. ( इ. सन ७११-७१२ )