Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९८ )

अरब, व तिबेटी लोकांवर आपले वर्चस्व स्थापून थेट काश्मीरच्या सरहद्दीपर्यंत आपला अंमल बसविला; परंतु इ. सन ७५१ मध्ये अरब लोकांनी कलेक लोकांच्या मदतं में चीनचा पूर्ण पराजय केला. * तथापि पुढे चीनने तिबेटवर आपले वर्चस्व पुन्हां कायम केले; कुशान वशांतील पराक्रमी राजा


 * अरब लोकांनी चिनी लोकांचा पराभव केल्यानंतर युद्धांत पाडाव केलेले कित्येक चिनी कैदी त्यांनीं आपणाबरोबर समरकंद येथे आणून ठेविले; या चीनी लोकांना कागद कसा तयार करावा, ही माहिती होती; त्यामुळे त्यांनी तेथे कागद तयार करण्याचा उद्योग सुरू केला, व तेथून ही कला पुढें युरोपांत गेली; त्यापूर्वी युरोपांत कागद कसा तयार करावा हे माहीत नव्हते; अरब लोकांनीच होकायंत्र, व बंदुकीची दारू पहिल्याने शोधून काढून तिचा उपयोग केला; कित्येकांच्या मताप्रमाणे चिनी लोकांस कागद तयार करण्याची कृती व बंदुका तोरांची दारू व ती बनविण्याची कृती अगदी पहिल्याने माहिती होती; तथापि अरब लोकांमुळे कागद बनविण्याची कृती युरोपांत माहीत झाली, आणि तोफांचा पहिल्याने उपयोग अब लोकांनी केला व त्यानंतर फ्रान्स त्यांचे अनुकरण करून नंतर पुढे इतरांनी त्यांचा उपयोग केलेला आहे; म्हणजे कादाचित इतर देशाला अथवा चीनला कागद व दारू वगैरेची माहिती असली व त्या गोष्टींचा त्यांनी शोध लावला असे गृहित धरिले तरी कागद, होकायंत्र, व बंदुकीची दारू, यांचा योग्य उपयोग करण्याचे श्रेय अरब लोकांनांच दिले पाहिजे; ( The Arabs invented at least made proper use of laper, Compass, and Guapowerd.) अरब लोकांनी हे जे शोध लाविले त्यामुळे मध्य युगति एकप्रकारें सुधारणेची लाट उसळून तिचे अनेक महत्वाचे व मननीय परिणाम घडून आले; इतकेच नाहीं तर अरब लोकांनी शोधून काढलेल्या व योग्य तन्हेनें उपयोगांत आणिलेल्या —कागद, होकायंत्र व बंदुका तोफांची दारू - या तीन गोष्टींमुळे जगातील वाङमय, राजकारण व युद्ध विषयक स्थिति, यांत पूर्णपणे बदल होऊन गेला; या बाबतींत वरील उतान्या शिवाय अणखी खालील प्रमाणे उल्लेख आढळतो:-

 "We have set forth the causes and principal effects of the great wave of civili-ation paused forth in the Midd à. Ages by the.Aral s which relled f one tholmes of He cules to the Contives of Asia. "