Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९७ )

दाणा वैरणही मिळू दिलं नाहीं; त्यामुळे त्याच्या सैन्याचे फार हाल झाले; व तें सैन्य उपरी निर्दिष्ट पुलावरून पलीकडे जात असतां त्याच्या दोन कमानी ऐन वेळी आसामी लोकांनी पाडून टाकिल्या व सर्व क्षेड्यांचाही नाश करून टाकिला; त्यामुळे त्याचे पुष्कळ सैन्य नदीत बुडून मरण पावले, व तो स्वतः शंभर स्वारानिशी पोहून अलीकडे आला म्हणूनच वांचला; आणि याच अपयशा- मुळ उद्विग्न होऊन बार खिलजी पुढे लवकरच मृत्यु पावला हा संस्मरणीय मूल गोहत्तोपासून अजमास बोस मैलावर अद्यापि अस्तित्वांत आहे. परंतु इल्लों ब्रह्मपुत्रानदाचा प्रवाह तेथून वीस मैल दूर गेला आहे; ब्रम्हपुत्रानदावर इतका जुना पूल दुसरा नाहीं; वरील स्वारी नंतरही हा प्रदेश हस्तगत करून घेण्याकरितां मुसलमानांनों कियेक स्वाया केल्या, परंतु त्याही आसामी लोकांनी निष्फळ केल्या. इ० सन १८१६ मध्ये ब्रम्ही लोकांनी आसाम प्रांत जिंकून आपल्या सत्तेखाली आणिला; त्यानंतर इ० सन १८२५ मध्ये इंग्रजांचे ब्रम्ही लोकांबरोबर युद्ध झाले; त्यांत इंग्रजांनी ब्रम्ही लोकांचा पराभव करून हा प्रांत आपल्या साम्राज्य हत्तेखालीं आणिला.
 चवथे राज्य तिबेट असून त्याचा हिंदुस्थानाच्या पूर्व इतिहासार्थी विशेषच निकटचा संबंध आहे; हा प्रदेश इ. स. ५५० पर्यंत चीनच्या अमला- खाली होता, परंतु त्यानंतर हूण ( यांना एफ्यॉलिटीज अथवा गौरहूण अशीही संज्ञा आहे. ) लोकांनी हा प्रदेश आपल्या ताब्यांत मिळविला; यावेळीं या राज्यांत गांधार आणि काश्मीर या प्रांतांचा समावेश होत असे तिबेटच्या राज्यावर हूण लोकांची सत्ता अल्प काळपर्यतच टिकली, व इ० सन ५६५ मध्ये इराणी व तुर्क लोकांनीं त्या प्रदेशावर आपला अंमल बसविला, व पुढे तुर्क हे एकटेच त्या प्रांताचे राज्यकर्ते बनले; त्यानंतर इ० सन ६३० पासून इ० सन ६४८ पर्यंतच्या काळांत चीनने तिबेटवर पुन्हा आपले वर्चस्व बसविलें; ' या काळांत गत्संग गंपो या नांवाचा राजा तिबेटमध्ये राज्य करीत असून त्यानं इ० सन ६३९ मध्ये ल्हासा शहराची स्थापना केली. हा राजा बराच कर्तृत्ववान असून त्याने नेपाळची राजकन्या भ्रुकुटी उर्फ हरिततारा व चीनची राजकन्या वेनशंग उर्फ धवलतारा या उभयताशीं विवाद केले होते; इ० सन ७१३ नंतर हा प्रति चीनच्या तात्र्यांत गेला, आणि चिनी बादशहाने तुर्क,