Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९६ )

नांव " प्रभातिया " ही त्यांच्या पलटणी आहेत इंग्लिश पलटणीमध्ये नोकरीत असलेल्या गुरखे. 'लोकांना नेपाळांत " गुरुंग " असे म्हणतात; गुरखे लोकांच्या भाषेत संस्कृत, "हिंदी व मराठी शब्दांचा बराच भरणा आहे; त्यांच्या भाषे हे आहे; त्यांचे मुख्य दैवत तुळजा भवानी हे आहे.शिवाय शितळादेवी इत्यादि नार्वेही त्यांच्या मध्ये आढळतात.

 तिसरें राज्य आसाम, यास कामरूप अर्सेही नांव आहे. या राज्याच्या पूर्व माहितीसंबंधी समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभावरून असे दिसतें कीं हा देश गुत्प साम्राज्याच्या सरहद्दीवर असून तो गुप्त साम्राज्यास खंडणी देत होता. प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यू.एनत्संग याच्या प्रवासवृत्तावरून असे दिसतें कीं तो इ० सन ६४३ या वर्षी आसाममधील नालंद मठांत राहात असल्या- वेळी त्यास कामरूपच्या भास्करवर्मा उर्फ कुमार या राजानें आपल्या भेटीस येणें भाग पाडले होतें; व पुढें कनोजचा राजा हर्ष याच्या मागणीप्रमाणे भास्करवर्मा यास, त्याला कनोज येथे पाठवावें लागलें होतें; पाल घर णं उदयास 'आल्यानंतर हा प्रदेश त्यांच्या अमलाखाली आला, व बाराव्या शतकांत कुमार पाल राजाने वैद्यदेव या नांवाचा आपला प्रतिनिधी त्या प्रांताचा कारभार पाह ग्यास ठेविला होता. पुढे शान लोकांपैकों आहोम टोळीने इ० सन १२२८ पासून कामरूप उर्फ आसाम देशांवर सारखे दल्ले करण्याचा सपाटा चालविला व अखेर तो प्रदेश हस्तगत करून घेऊन ते तेथील राज्यकर्ते बनले. हा प्रदेशही नेपाळ- प्रांताप्रमाणेच केव्हांही मुसलमानांच्या ताब्यांत गेला नाहीं; इतकेंच नव्हे तर जेव्हां मुसलमानांनीं तो हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आसामी लोकांनीं तो निष्फळ केल्याशिवायही सोडिला नाहीं. इ० सन १२०४ मध्ये बख- त्यार खिलजी याने हा प्रांत सर करण्याकरितां दहा हजार सैन्यानिशीं त्यावर स्वारी केळी, आणि पश्चिम सरहद्दीवरील ब्रह्मपुत्रा नदीच्या थडींतील कतोरिया नदीच्या काठाने एके ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवरील वीस कमानीचा पूल ओलांडून दार्जिलिं- गच्या उत्तर बाजूच्या पहाडा लगतच्या बाजूने पंधरा दिवसांची मजल चालून आला; या ठिकाणी आसामी सैन्यानं मुसलमानी सैन्यावर मोठया निकराने आपले लांच भाले व धनुष्य बाण यांनी हल्ला केला, व त्यांत बखायारचे बरेच सैन्य कापून काढिलें; इतक्यांतच, आपणावर दुसरी मोठी शिलकी फौज चाल करून येत आहे, असे त्यांस कळलें, त्यामुळे तो मार्गे परतला; परंतु आसामी लोकांनी त्यास घड -