Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९३ )

बंगालच्या उत्तर बाजूस असलेल्या हिमालयाच्या दक्षिणेकडील उरतणीवरील बाजूचे सर्व पठार आणि दन्याखोऱ्या आपल्या हस्तगत केल्या; आणि त्याच्या पाठीमागून गादीवर आलेल्या राज्यकर्त्यांनी औंध, रोहिलखंड, आणि पंजाबच्या सरहद्दीस भिडलेला गंगा व यमुना या नद्यांनीं सुपीक झालेला प्रदेश यांच्या उत्त- रेकडील उंचवट्याच्या बाजूस असलेल्या मुलुखांतही आपली तरवार गाजविलीं; मोगल राज्यकर्त्यांनीं ह्या दुर्गम डोंगराळ आणि रानटी प्रदेशांत आपला शिरकाव व्हावा म्हणून केव्हाही आस्था दाखविली नाहीं; हा प्रदेश पूर्वी लहान लहान हिंदू राजकर्त्यांच्या ताभ्यांत होता; आणि ते खालील सपाट प्रदेशांतील लूट फाटीव- रच बहुतांशी आपला निर्वाह करीत असत परंतु गुरख्यांच्या प्रमुख सरदारानें बंगालच्या परिस्थितीवरून घडा घेऊन एक शिस्तीचें सैन्य तयार केले आणि त्या सैन्याच्या मदतीनें त्याने तेथील राज्यकर्त्यांना सहज पालथे घातलें. या सर- दाराचे वंशज बराच काळपर्यंत राज्यशकट हांकीत होते; प्रत्येक राज्यक- त्याच्या राज्यारोहणाच्या प्रसंग नेहमीप्रमाणे बेबंदशाही माजत असे, आणि शेवटीं इ०सन १८०५ मध्ये कटवाल्यांनी त्याच्या नातवाचा खून केला. त्यानंतर एकाच रज्यकर्त्याच्या ताब्यांत तें राज्य पुष्कळ काळपर्यंत असें कधींच राहिलें नाहीं. आणी प्रमुख जातींपैकीं कांहीं उच्च दर्जाच्या लष्करी अधिका-यांच्या हातात तो प्रदेश गेला. हे अधिकारी वंशपरंपरेच्या राज्यक: त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवितात, व त्याच्याच नांवानें राज्यकारभारही चालवीत असतात. ज्याअर्थी त्यांचे सेन्य युरोपियन पद्धतीनें तयार केलेले व सज्ज ठेविलेलें होतें. कारण लष्करी बाबतींत इंग्लिश नमुन्याचे नेहमीं हुषारीनें अनु- "करण करणारी गुरखा ही जात आहे त्याअर्थी त्यांनीं पश्चिमेकडे लहान लहान डोंगराळ संस्थानापर्यंतच्या सर्व प्रांतावर आपली विजय पताका फडकवीत नेली होती, आणि इंग्लिशांच्या हद्दींतील हिमालयाच्या खालच्या प्रदेशांमधील भागांत हि अतिक्रमण करण्यास त्यांनीं सुरवात केली होती. हिमालय पर्वताच्या सरहद्दीवरील लहान लहान राज्यकर्त्यांमध्ये आणि बंगाल प्रांतांतील मोठमोठ्या धनाढ्य जमीन. दारांमध्ये फार प्राचीन काळापासून हाडवैर चालत आलेलें होतें; कारण नेपाळव्या सरहद्दीवरील सर्व सरदारांनीं त्यांच्याजवळील खालच्या मैदानांतील जमिनीचा बराच भाग काबीज केला होता; परंतु ह्यावेळीं गुरख्यांनी वरील सर्व पहाडी मुख आपल्या तात्र्यांत घेतला असून खालील तळ देश इंग्लिशांनी आपल्या