Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९२ )

या नावाच्या लोकांचा पराभव करून त्याने तेथील गादी मिळविलीं; ही गोष्ट इ. सन १५५९ मध्ये म्हणजे शके १४८९ भाद्रपद वद्य ८ रोहिणी नक्षत्रावर -घडली.
 गोरखा येथे या कुलांत द्रव्यशहानंतर पुरंदर, छत्र, रामदंबर, कृष्ण, रूद्र, पृथ्वीपती व नरभूपाल, पृथ्वी नारायण, प्रतापसिंह व रणबहादुरशहा हे अनु- हे • क्रमे गादीवर आले. पृथ्वीनारायण यानें नेपाळच्या सभोवतालचा बहुतेक प्रदेश . जिंकून आपल्या राज्यास जोडिला. याच वेळेच्या सुमारास बंगालमधील मूर्शि- दाबादचा नबाब-अथवा बंगालचा नवाब - कासीम अलीखान उर्फ मिरकासीम - याचा इंग्रज लोकांनी पराभव केला; तेव्हां तो नेपाळमध्ये पळून जाऊन नेपाळांत भाश्रयास राहिला; व या उपकाराचे उतराई होण्याकरितां पृथ्वीनारायण यानें नेपाळी लोकांवर स्वारी केली त्या प्रसंगीं मकवानपूरच्या मार्गानें त्यानें सहा हजार फौज नेपाळकरांच्या मदतीस पाठविली; परंतु पृथ्वीनारायणाच्या सैन्यानें त्या फौजेचा नाश केला. त्यानंतर पांच हजार नाग लोकांची फौज नेपालक- राच्या मदतीस येण्यास निघाली असतां पनावती येथे पृथ्वीनारायण याने तिचा- ही पराभव केला; त्याप्रमाणेच इंग्लिश क्याष्टन किनलॉक याच्या दिमतीखालची फौज़ सिंधूलीगरी येथे असता तिचाही त्याने पराभव केला; व नेपाळच्या आजू- बाजूचा सर्व प्रदेश जिंकून त्यानें आपल्या राज्याची पूर्व सरहद्द थेट सुकीमपर्यंत वाढविली, व तो त्या प्रदेशांत एक बलिष्ठ सत्ताधारी बनून गेला; त्यानंतर रण बहादूरशहा, विक्रमशहा, राजेंद्र विक्रमशहा, सुरेंद्र विक्रमशहा, व पृथ्वीवीर विक्रमशहा (इ० सन १८८१ मध्ये गादीवर आला. ) हे अनुक्रमे गादीवर आले; हेंच घराणे हल्लींही नेपाळ येथील राजघराणे म्हणून असून तेथील प्रधान पद सरजंगबहादूर याच्या घराण्याकडेस चालत आहे; व त्या घराण्याचा आणि तेथील राजघराण्याचा फार निकटचा शरीरसंबंध आहे. नेपाळ राज्यांत काट- मांडू येथे इंग्रज सरकारतर्फे एक रेसिडेंट असतो; परंतु हें राज्य स्वतंत्र म्हणून · गणले गेलेले असून त्यास तेथील राज्यकारभारांत हात घालितां येत नाहीं.
 या बाबतीत आणखी असाही उल्लेख आढळतो की, ( British Dominion in India हे पुस्तक पान २९४ २९७ पहा.) इ० सन १७६८ च्या सुमारास गुरखाली अथवा गुरखे लोकांच्या एका सरदाराने