Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९१ )

भूपती उर्फ संगराणा यांस उदयवन उर्फ उदेसिंग, फत्तेसिंह व मन्मथ राणाजीराव असे तीन पुत्र होते; यापैकीं फत्तेसिंह यास एक अत्यंत लावण्यवती कन्या होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती बादशहाच्या कानावर गेली, तेव्हां त्याने या कन्येबद्दल राण्याशीं बोलणें लाविलें. परंतु राण्याने बादशहाचे हैं म्हणणें अमान्य केलें, तेव्हां बादशहानें चितोडगडावर स्वारी केली; व उभयतांमध्ये भयंकर रणसंग्राम होऊन त्यांत भूपतीराव, फत्तेसिंहराव आणि दुसरे हजारों रजपूत प्राणा मुकले; त्याप्रमाणेंच तेराशे रजपूत स्त्रियांनीं ह्या प्रसंगीं चिता पेटवून तींत आपले प्राण दिले, आणि ज्या फत्तेसिंहाच्या सुंदर कन्येमुळे हा घोर प्रसंग उद्भवला त्या कन्येनेंही तापलेल्या तेलाच्या कढईत उडी टाकून स्वतःचा प्राण नाश केला !.
 या प्रसंगांतून जे मार्गे राहिले त्यांपैकी उदयवन राणाजीराव यानें उदे- पूर शहराची स्थापना करून तो तेथें राज्य करूं लागला. या राण्यास ब्रम्हनीक आणि भूपाल असे दोन मुलगे होते. त्यांचे आपसांत कांहीं घरगुती कारणामुळे वैमनस्य आले, तेव्हां भूपाल हा उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत निघून गेला. ( इ. सन १४९५ ) व भीरकोट प्रांतांतील खिलन या गांवीं जाऊन राहिला; तेथे त्यानें बरीच पडित जमीन लागवडीस आणून तो आपला उदर निर्वाह करूं लागला. या ठिकाणीं त्यास कांचा व मिचा असे दोन मुलगे झाले; त्यांपैकीं कांचा हा मोठा शूर होता; तो खिलन येथून धोर येथे गेला, आणि मंग्राट प्रदेश जिंकून त्यानें गरहोन, सतुन, भीरकोट, व धोर या प्रदेशावर आपली राजसत्ता स्थापन केली; त्याप्रमाणेच धाकटा मुलगा मिचा यानेही नवाकोट येथें जाऊन तेथें आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलें. या घराण्यांत मीचा, जयन, सूर्य, मीचा ( दुसरा ) विचित्र व जगदेव हे सहा राज्यकर्ते अनुक्रमे गादीवर आले. यांपैकी शेवटचा जगदेव याचा मुलगा कुलमंडण यानें कास्कीचें राज्य मिळविलें. यास मोंगल बादशहाकडून " शहा " हा किताब मिळाला होता; त्यास एकंदर सात मुलगे होते; त्यांपैकी पहिला नवाकोट येथील गादीवर बसला, व दुसरा मुलगा काळू हा ल्यामगंज प्रांतांतील सैंख लोकांच्या दुरादांडा येथील गादीवर बसला; परंतु तो लवकरच मारला गेला, त्यामुळे यशोदन हा तेथील गादीवर आला; त्यास नरहरीशहा व द्रव्य- शहा असे दोन मुलगे होते; त्यांपैकीं नरहरीशहा ल्यामगंजचा राजा झाला, द्रव्यशहा हा गोरखा येथे जाऊन तेथील खास या नांवाच्या जातीपैकीं खडका