Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ९० )

Wright M. A. M. D. 1877 असें दिसतें कीं गोरखे, गुरखे,. गोरखाली, अथवा गुरखाली हें नांव, गोरख अथवा गोरखाया नांवांचे नेपाळचे जे एक, काठमांडूपासून पश्चिमेस सुमारें चाळीस मैलावर जुन्या राजधानीचे शहर होतें त्यावरून तेथील राज्यकर्त्यांना पडले आहे. सर आलफ्रेड लॉयन याने आपल्या ग्रंथांत ( British Dominion in India Page 294 पहा . ) गुरखे लो- कांची उत्पत्ती सपाट प्रदेशांतील हिंदू व डोंगराळ प्रदेशांतील जाती यांच्या मिश्रणानें झालेली आहे, असे लिहिले आहे; तथापि गुरखे लोकांची उत्पत्ती रज- पुतापासून झाली आहे, आणि हल्लींचे तेथील राजघराणें हें उदेपूर येथील राज- घराण्याची शाखा आहे, असे नेपाळच्या व राजस्थानच्या इतिहासावरून कळते त्याप्रमाणेच मुसलमान लोकांनीं राजपुतान्यावर स्वारी करून तेथील पुष्कळ लोकांस राजपुताना सोडून पळून जाण्यास भाग पाडिले त्यावेळीं गुरखे लोकांचे पूर्वज नेपाळांत जाऊन राहिले, असा उल्लेख आढळतो.

 असें सांगतात कीं अती प्राचीन काळापासून सूर्य व चंद्रवंशांतील राजे- लोक नुसलमानांच्या त्यांच्यावर स्वाया होईपर्यंत शांततेने आपला राज्यकारभार करीत होते; परंतु मुसलमानांचा हिंदुस्थानांत प्रवेश झाल्यावर अशा पुकळ राज्यकर्त्यांची सत्ता नष्ट झाली. तथापि याच काळाच्या सुमारास सूर्यवंशामध्ये श्री विक्रमादित्य आणि शालीवाहन हे अत्यंत पराक्रमी राजे निर्माण झाले, त्यांनी सूर्य व चंद्र घराण्यांतील पदभ्रष्ट झालेल्या राजांचा तपास काढून अजमार्से आठशे राज पुरुषांनां पुन्हां पूर्वीप्रमाणे अधिकारारूढ केलें; त्यांमध्यें ऋपिराज राणाजी या नांवाचा एक चंद्रवंशीय राजा होता, त्यास भट्टारक हा किताब असून चितोरगड येथील राज्यावर त्याची स्थापना करण्यांत आली होती, या राणाजीच्या तेरा पिढ्यांपर्यंत हें राज्य स्वतंत्र होते; या घराण्यांतील तेरावा राजा देशवर्मा भट्टारक यांस अयुतवन राणाजी या नांवाचा एक मुलगा होता. याच्या कारकीदीत मुसलमानांनीं चितोरगड काबीज करून अयुतबन यास आपला मांडलीक बनविले; त्यानंतर बराचुवन, कनकवन व 'येशेोचन असे तीन मांडलिक राजे चितोरगडच्या गादीवर आले; त्यानंतर अयुदुंबर हा पराक्रमी राजा गादीवर आला, त्यास " राव " हा किताब मोंगल बादशहाकडून मिळाला होता. अयुदुंबर हा या घराण्यांतील अठरावा पुरुष असून, भूपती उर्फ संगराणा या पुरुषापर्यंत एकंदर तेहतीस पुरुष या गादीवर विराजमान झाले;