Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८९ )

जुलमी होता असा उल्लेख आढळतो; त्यानंतर पुढे सेनदेव या नांवाचा राजा काश्मीर प्रांतांत श्रीनगर येथे राज्य करीत होता; त्याने शहामीर या नांवाच्या "एका तुर्की मुसलमानास आपल्या नोकरीत ठेविलें होतें; हा शहामीर कर्तृत्व- मान असून सेनदेवाचा मुलगा रणचंद्र याच्या कारकीर्दीत तो राज्याचा मुख्य प्रधान झाला होता; रणचंद्राच्या मृत्यूनंतर काशघरचा राजा आनंददेव याने काश्मीरची राजसत्ता आपल्या हस्तगत करून घेतली, आणि शहामीर वगैरे सर्व मुसलमान लोकांस त्याने नोकरींतून काढून टाकिलें; त्यामुळे अस्व- •स्थता उतन्न होऊन त्या लोकांनी शहामीरच्या धुरिणत्वाखाली बंड केलें; तेव्हां मोठी चकमक उडून आनंददेव तीत मारला गेला; तथापि त्याची राणी कवला- देवी हिने शहामीरच्या सैन्याबरोबर कांहीं काळ मोठ्या धैर्याने व नेटानें तोंड दिलं; परंतु अखेरीस शहामीरनं तिचा पराजय करून काश्मीरचें राज्य आपल्या तात्र्यांत घेतलें; आणि शमसुद्दीन हें नांव धारण करून इ० सन १३२६ मध्ये त्यानें काश्मिरांत आपला मुसलमानी अंमल चालू केला; राणी - कवलदेवी ही अजमासे आठ वर्षांनंतर शमसुद्दीनबरोबर लग्न लावण्यास कबूल झाली, आणि इ० सन १३३४ मध्ये हॅ लग्न होऊन, काश्मीरमधील हिंदू राज्य नामशेष झालें.
 दुसरे राज्य नेपाळ, हॅ असून मॉर्यकुलोतन्न राजा अशोक याच्या प्रत्यक्ष अंमलाखालीं हा प्रदेश होता. समुद्रगुप्ताच्या वेळीं तें एक मांडलीक राज्य असून हर्ष राजानें त्या प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलें होतें; त्यानंतर “ठाकूर " या नांवाच्या वंशांतील अंशुवर्मा या नांवाच्या मनुष्यानें नेपाळमध्ये आपल्या नव्या राज्याची स्थापना केली. मध्यंतरी कांहीं काळ हा देश तिबेटच्या सत्ते- खालीं होता, परंतु पुढें तो स्वतंत्र होऊन इ० सन ८७९ या वर्षी नेपाळांत स्वतंत्र शक सुरू झाला; गुरखे लोकांनी हा प्रांत जिंकून घेण्यापूर्वी अयोध्येहून आलेले हरदेव सिंह यांचे वंशज, व नंतर मल्ल घराण्याचे वंशज हे नेपाळांत अनुक्रमे राज्य करीत होते; नेपाळ प्रांत आजतागायत कधींही मुसलमानांच्या ताब्यात गेला नाहीं.
 नेपाळच्या इतिहासावरून ( History of Nepal by Munshi Shiv Shankar Sing and Pandit Shri Gunanand Edited by D.