Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८८ )

मौर्य सामाम्राज्यांत मोडत होता; पुढे दुर्लभवर्धन या नांवाच्या एका पुरुषानें आपला कर्कोट वंश ( हा कर्कोट वंश नसून नागवंश होता असा उल्लेख आढ- ळतो. ) स्थापन केला; त्यानंतर चंद्रापीड व मुक्तापीड उर्फ ललितादित्य हे गादीवर आले. हा ललितादित्य मोठा शूर असून त्यानें कनोजचा राजा यशोवर्मा ब आपल्या सरहद्दीलगतच्या तिबेट, भूतान व सिंघ येथील हूण लोक, यांचा पराभव करून आपल्या राज्याचा बराच विस्तार केला; त्याने सूर्याचं " मार्तंड " या नांवाचे मंदीर बांधिले असून ते हल्लींही अस्तित्वांत आहे; काश्मीर देशांत कल्हण या नांवाचा एक पंडित रहात होता; त्यानें इ० सन १९४८ मध्ये " राजतरंगिणी " या नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे; त्यावरून असे दिसतें कीं ललितादित्यानंतर गादीवर आलेला राजा जयपीड उर्फ विजयादित्य हा विशेष क्रूर व लोभी होता; व तो अनीतीच्या मार्गाचे अवलंबन करीत होता; यावंशानें इ० सन ६२७ पासून इ० सन ८५५ पर्यंत राज्य केलें; त्यानंतर उत्पल वंश अधिकारारूढ झाला; त्याचा मूळ पुरुष अवंतीवर्मा हा असून त्यानें इ० सन ८५५ पासून इ० सन ८८३ पर्यंत राज्य केलें. हा मोठा पराक्रमी व विद्वानांचा भोक्ता असून त्यानें काश्मीरांतील अवंतीपूर हे शहर बसविले; त्याचा प्रधान सुन्य हाही मोठा प्रजादक्ष असून त्याच्या देखरेखीखालीं अवंतीवम्यनेिं लोकोपयोगाकरितां कित्येक तलाव व कालवे बांधिले; अवंतीवर्याच्या मृत्यूनंतर शंकरवर्मा गादीवर भाला, परंतु तो जुलमी असल्याचा व त्याने अनेक देवालयांची उप्तन्ने जस केल्याचा उल्लेख आढळतो; पुढे इ. सन ९१७ यावर्षी पार्थ या नांवाचा पुरुष गादीवर आला; तो मोठा क्रूर असून प्रत्यक्ष आपला बाप पंगू याचाही त्याने खुन केला; शिवाय हा नीतिभ्रष्ट असून त्याने अनेक पशुतुल्य कृती केल्या; परंतु त्यास भयंकर व्याधी जडून इ. सन ९०९ यावर्षी तो मृत्यू पावला; त्यामुळे त्याच्या पुढील आयुष्यातील लीला बंद पडल्या; त्याचा मुलगा उन्मत्तावंती हाही आपल्या बापाप्रमाणेच दुष्ट असून बाप लोकांना चाबुकानें मारी तर मुलगा त्यांना विचवाकडून दंश करवी; या उभयतां पिता पुत्रानंतर पुढे दिद्दा या नांवाची एक स्त्री गादीवर आली; तीही मोटी जुलमी होती व तिने सतत पन्नास वर्षे अतीशय वाईट रीतीनें राज्यकारभार चालविला; तिच्यानंतर अकराव्या शतकांत कलश व हर्ष हे राजे गादीवर आले; त्यांतील हर्ष हा