Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८७ )

धन्यता, व तो असुरी आनंद, लवकरच खुद्द त्याचाच नाश करण्यास कारणी- भूत झाला ! काळ नष्ट आल्यामुळे असला स्वार्थी कुलदीपक जन्मास आला; आणि शेवटी स्वतःबरोबरच देशाचाही त्यानें आपण होऊन सर्वस्वी घात करून घेतला !!
 जयचंदाच्या या अधोगतोस नेणाऱ्या वर्तनाचा काय परिणाम झाला ?- त्याचा परिणाम हा झाला कीं, जयचंदानें पृथ्वीराजास नामशेष करण्याकरितां बोलावून आणिलेल्या शिहाबुद्दीनने हिंदुस्थानांत आपले वर्चस्व स्थापन केलें, आणि देशद्रोही व स्वकीयांचा सूड उगविण्याकरितां तिन्हाइतास आपल्या घरात आणणाऱ्या त्याच जयचंदाचा त्याच शिहाबुद्दीननें पुढील वर्षी पराभव करून ( इ० सन ११९४ ) त्यास नामशेष केले, व अजमीरप्रमाणेच कनोज शहराची त्यानें धूळधाण करून टाकिली. तेव्हा तेथील रजपूत राठोडवंश मारवाडtत गेला, व त्याने जोधपूर येथें राज्यस्थापना केली.
 इ. सन १९९३ मध्येच अजमीर व दिल्ली येथील पृथ्वीराज चव्हा- णाच्या राज्याप्रमाणें महोबा येथील चंदेल उर्फ चंडेल घराणे महमद घोरी यानें आपला सरदार कुतुबुद्दीन ऐबक याच्यामार्फत जिंकून ते आपल्या राज्यास जोडिलें; त्याप्रमाणेच माळव्याच्या पवार उर्फ परमार घराण्याचीही मुसलमानांच्या हातूनच वाताहात झाली; हे घराणें कृष्णराय या नांवाच्या परमार वंशांतील एका पुरुषानें स्थापन केलें होतें; या घराण्यातील तिसरा राजा हर्षदेव हा मोठा पराक्रमी पुरुष असून त्यानें राष्ट्रकूट राज्याची राजधानी मान्य- खेट अथवा मालखेड हैं शहर लुटिलें होतें. या घराण्याचे राजधानीचे ठिकाण क्षिप्रातीरीं असलेलें अवती उर्फ उज्जनी हैं शहर असून विद्वान लोकांचा संग्रह- कर्ता प्रसिद्ध राजा भोज हा याच घराण्यांत निर्माण झाला होता. ( इ०सन- १०१० ) है राज्य अल्लाउद्दीन खिलजी ( कारकीर्द इ०सन १२९६ ते इ.सन- १३१६ ) याने जिंकून मुसलमानी राज्यांत सामील केले, आणि याच्याच कार- कीर्दीत मलिक काफूर याच्या प्रमुखत्वाखालील मुसलमानी सैन्याचा ] नर्मदान- दीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत प्रथम प्रवेश झाला.

 हिंदुस्थानच्या उत्तरेकडील भागांत, व सरहद्दीलगत काश्मीर, नेपाळ,आसाम, व तिबेट वगैरे राज्ये होती; त्यांपैकीं काश्मीर प्रांत अशोकाच्या वेळेस