Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८६ )

राठोड राजा जयचंद याचें पुढें भतीशय वांकडे आलें; व पृथ्वीराजाचा पाडाव करण्यांकरितां जयचंदाने महमद घोरी यास प्रोत्साहन दिले; व शेवटी इ. सन ११९३ यध्यें महमदघोरी व पृथ्वीराज यांच्यामध्ये स्थानेश्वर येथे भयंकर संग्राम होऊन त्यांत पृथ्वीराजाचा पराभव झाला, व तो महंमद घोरीच्या हातीं जिवंत सांपडला; त्यास घोरीने ठार मारिलें व अशा रीतीनें हें चव्हाण घराणे नष्ट झाले.
 स्थानेश्वरचें हें युद्ध ऐतिहासिकदृष्ट्या अतीशय महत्वाचे आहे; कारण या युद्धांत रजपूत सैनिकांचा जेवढा जमाव एकत्र झाला होता, तेवढा त्यापूर्वी कधींही एकत्र झालेला नव्हता; शिवाय हिंदुस्थानावर आलेली मुसलमानी सत्तेची जंगी व जोराची लाट थोपवून परतविण्याचा हिंदु राजे राजवाड्यांचा हा शेवटचा व मोठ्या निकराचा प्रयत्न असून तो निष्फळ झाल्यावर म्हणजे मुसलमान लोक या युद्धांत विजयी झाल्यामुळे- हिंदुस्थान देशाचे ते राज्यकर्ते होणार ही गोष्ट बहु- तेक ठरून चुकल्या सारखीच झाली होती; आणि आपसांतील मतभेद, फाटाफुट, व मत्सरभाव यामुळे स्वाभिमानी व वर्चस्वकक्षेबाहेर राहूं इच्छिणान्या राज्य- कर्त्यास एक एकटे गाठून त्यांना नामशेष करण्यांत, आपल्या वर्चस्वाच्या आधीन झालेल्यांच्या मदतीनें इतरांना नामोहरम करण्यांत, आणि अखेरीस त्यांच्यावर साध्या अथवा सक्तीच्या मार्गाने, व सरळ अथवा सायासाच्या रीतीनें आपले पूर्ण व निर्विवाद वर्चस्व स्थापन करून कायम ठेवण्यांत ते यशस्वी होणार या गोष्टीची शंका घेण्यास फारसें कारण नसून ती गोष्टही वरील प्रमाणेच निश्चित झाल्यासारखी होती.
 कनोजाधिपती व राणी संयोगिता हिचा पिता जयचंद यानें दिल्लीपती पृथ्वीराज याचा पाडाव करण्याकरितां शिहाबुद्दीनघोरी याजकडेस आपलें वकीलमंडळ पाठवून त्यास निमंत्रण केले, व पानपतच्या युद्धभूमीवर पराभूत झाल्यामुळे अपमानाने चिडलेल्या शिहाबुद्दीन घोरीनें पृथ्वीराजाचा सूड घेण्या- करितां आलेल्या संधीचा योग्य फायदा घेण्याच्या इच्छेने त्याच्यावर स्वारी केली आणि त्यास पूर्णपणे नामशेष करून टाकिलें. आपला दुष्मनाचा कांटा" पृथ्वीराज हा आपण अशा रीतीनें पार उखडून टाकिला याबद्दल जयचं- दास धन्यता वाटली असेल, आणि आनंदही झाला असेल; पण ती सैतानी