Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८५ )

हस्तगत करून घेतले. पुढे त्याचा नातू दुसरा भोजराज याच्या कारकीर्दीत बुंदेलखंडचा राजा यशोवर्धन हा स्वतंत्र झाला, व त्या राज्याचा मोठा झपाट्याने हास होण्यास सुरवात झाली. दुसऱ्या भोजराजाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा. महिपाल हा गादीवर आला. त्यावेळीं नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशति • राष्ट्रकूट घराणें राज्य करीत होतें. या घराण्यांतील राजा ध्रुव यानें तोमार घरा- ण्याची सत्ता नामशेष करण्याकरितां महिपालबरोबर एक मोठें निकराचे युद्ध केले; व त्यांत त्याचा पूर्ण पराजय करून त्याची सत्ता नामशेष होण्याच्या पंथास आणिली; ( इ० सन ९१७ च्या सुमारास ) त्यावेळी या संधीचा फायदा घेऊन " परमार " या नांवाच्या एका घराण्याने माळवा प्रांतांत आपले • स्वतंत्र राज्य स्थापन केलें, व राजपुतान्यांत " चव्हाण " या नांवाचा दुसरा एक रजपूत वंश स्वतंत्र राज्याधिकारी बनला.
 अशा रीतीनें गुर्जरवंशीय तोमार घराण्याच्या अंमलाखालीं फक्त कनोजचे राज्य कायम राहिलें, व त्या ठिकाणीं त्या घराण्यानें कसाबसा जीव जगवून इ० सन १०४० पर्यंत राज्य केलें. पुढें गहरवाड किंवा राठोड या नांवाच्या - रजपूत घराण्यांतील चंद्रदेव या नांवाच्या एका पराक्रमी पुरुषाने बहुतेक तोमार राज्य हस्तगत करून घेऊन कनोज ही आपल्या राज्याची राजधानी केली, भाणि अशा रीतीनें दिल्ली व त्याच्या आसपासचा थोडासा प्रदेश एवढाच कायतो तोमार घराण्याच्या तात्र्यांत राहून त्यांचे वर्चस्व पूर्णपणे कमकुवत झाले. या वंशति अनंगपाल या नांवाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. या अनंग- पालानेच प्रथम दिल्ली येथे किल्ला बांधिला असून त्यास लालकोट अशी संज्ञा आहे. त्यास पुत्र संतती नसून फक्त दोन कन्या होत्या; त्यापैकीं एकीचा, प्रसिद्ध पृथ्वीराज चव्हाण हा मुलगा होता; अनंगपाळास मुलगा नसल्यामुळे • . त्याचे राज्य अजमीर येथील चव्हाण वंशाकडे आले.
 हा चव्हाण वंश इ. सन ७८० पासून अजमीर येथें राज्य करीत होता. या घराण्यांतील चोवीसावा राजा सोमेश्वर यानें अनंगपाळ याच्या एका - मुलीशी लग्न केलें असून या दांपत्यापासून झालेला प्रसिद्ध पुरुष पृथ्वीराज चव्हाण हा होय; यास आपल्या वडिलांचे अजमीर येथील व अनंगपाल याचें दिल्ली येथील अशी दोन राज्ये मिळाली होतीं. या पृथ्वीराजाचें व कनोज येथील