Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८२ )

घराण्याचा अंमल चालू राहिला; यापैकीं बहारप्रांत गुप्त घराण्याच्या सत्तेखाली होता तरी त्या ठिकाणीं " पाल" या नांवाचे एक घराणे मांडलिक या नात्यानें राज्य करीत होतें; या घराण्यांतील गोपाल या नांवाच्या एका शूर पुरुषानें गुत राज्यास उतरती कळा लागल्याचे पाहून आपलें पाल घराण्याचे राज्य स्थापन * केलें ; ( इ० स० ७३० ते ७४९ च्या सुमारास . ) गोपाल हा बौद्धधर्मी असून त्याने उदंडपूर येथे एक मोठा मठ स्थापन केला; त्याच्या राणीचे नांव देड्डा देवी हैं असून हिच्या पोटीं त्यास धर्मपाल या नांवाचा एक मुलगा झाला; तो मोटा शूर व पराक्रमी असून त्यानें गुत घराणे नामशेष केलं, आणि बंगाल व . बहार या प्रांतांवर आपल्या पाल घराण्याचा अंमल सुरू केला. तिबेटचा इतिहास- कार तारानाथ याच्या म्हणण्याप्रमाणे या धर्मपालाचे राज्य बंगालच्या उपसा- गरापासून तो दिल्ली व जालंदरपर्यंत व दक्षिणेस विंध्याद्रीपर्यंत पसरलेलें होतें; त्यानें कनोजचा राजा इंद्रायुध यास पदभ्रष्ट करून व त्याचा मुलगा चक्रायुध यांस गादीवर बसवून त्या प्रांतावर आपले वर्चस्व स्थापन केल. ( इ० सन ८०० च्या सुमारास ) त्याने प्रसिद्ध विक्रमशीला या नावाचा एक मोठा विस्तृत मठ स्थापन केला; या मठांत १०७ मदिरें व सहा पाठशाला होत्या धर्मपाला- नंतर देवपाल हा गादीवर आला; त्यानें अजमासे अट्ठेचाळीस वर्षे राज्य करून कलिंग व आसाम, हे प्रांत आपल्या वर्चस्व कक्षेखालीं आणिले; त्यानंतर दाक्- पाल व महिपाल हे राजे अनुक्रमे गादीवर आले; त्यांपैकी महिपाल हा विशेष लोकप्रिय असून अद्यापि त्याची कीर्ती ऐकू येत आहे. तो इ०सन १०३० च्या सुमा रास मृत्यू पावला. त्यानंतर जयपाल, विग्रहपाल, अथवा दुसरा महिपाल हे गादी- वर आले; हा महिपाल फार अनीतिमान् होता; त्यामुळे राज्यभर त्याच्याविरुद्ध बंडे उद्भवली; त्यानें आपला भाऊ रामपाल यासही प्रतिबंधांत ठेविले, आणि अनियंत्रीतपण राज्यकारभार करू लागल; तेव्हां कैर्व वंशातील दिव्य अथवा दिव्योक या नांवाच्या एका शूर पुरुषाने सपष्ट करून टार मारिलें व राज्यसूत्रे आपल्या हातीं घेतलं. दिव्योकानंतर त्याचा पुतण्या भीम हा कारभार पाहू लागला; याच्या कारकीर्दी पल यार्ने प्रति- बर्धातून आपली मुक्तता करून घेतली; राष्ट्रकूट घराण्याच्या साह्याने भीमावर चढाई करून येऊन त्याचा पराभव वरून वखर रेलें, आणि पालवं. शाची गदी पुन्हा आपल्या ताब्यात मिळविटी रामपाल नंतर दनपाल,